एक्स्प्लोर

Chandu Chavan : 'पाकमध्ये कारावास, मायदेशी परतल्यानंतरही अन्यायकारक कारवाई'; माजी सैनिकाचा सरकारला इशारा, काय आहे नेमकं प्रकरण?

jalgaon News : भारतीय लष्करातील काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारवाईने आपल्यावर सेवा मुक्त करण्याची अन्यायकारक कारवाई करण्यात आली, असे म्हणत माजी सैनिकाने सरकारला इशारा दिलाय.

जळगाव : भारतीय लष्करातील काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारवाईने आपल्यावर सेवा मुक्त करण्याची अन्यायकारक कारवाई करण्यात आली. त्यामुळे आजपासून जळगाव (Jalgaon) येथे उपोषण करत असल्याचा इशारा माजी सैनिक चंदू चव्हाण (Chandu Chavan) यांनी दिला आहे. यामुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, देशाच्या सीमेवर सेवा बजावत असताना पाकिस्तानात (Pakistan) शिरल्याने पाक लष्कराने, चंदू चव्हाण या जवानाला अटक केली होती. तीन महिन्यांच्या करावासानंतर चंदू चव्हाण यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर भारतीय लष्कराने (Indian Army) चंदू चव्हाण यांच्या विविध चौकशा केल्या होत्या. 

पुढील जीवन जगायचे कसे?

या चौकशी दरम्यान चंदू चव्हाण यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू न शकल्याने भारताच्या लष्करातून चंदू चव्हाण यांना बरखास्त करण्यात आले होते. मात्र काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारवाईमुळे आपल्याला नोकरी गमवावी लागली आहे.  अकरा वर्ष देशसेवा केल्यानंतर आपल्याला सेवा समाप्तीनंतरचे कोणतेही लाभ दिले गेले नसल्याने पुढील जीवन जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाल्याचे चंदू चव्हाण यांनी म्हटले आहे. 

अन्यायकारक कारवाई का? 

पाकमधून आलेल्या सीमा हैदरला सरकार सुविधा देते. शरण आलेल्या अतिरेक्यांना, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सुविधा देते. मग आपण अकरा वर्ष देशसेवा केल्यानंतर आणि पाकमध्ये तीन महिने कारावास सहन केल्यानंतर आपल्यावर अशी अन्यायकारक कारवाई का? असा सवाल उपस्थित करत चंदू चव्हाण यांनी आजपासून आपल्या परिवाराच्यासह जळगाव (Jalgaon) येथे उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मागण्यांकडे सरकार लक्ष घालेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. 

पाकिस्तानच्या ताब्यात होते 3 महिने 21 दिवस 

दरम्यान, चंदू चव्हाण हे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचे रहिवासी आहेत. भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेल्यावर पाकिस्तानने त्यांना पकडले होते. पाकिस्तानच्या ताब्यात 3 महिने 21 दिवस होते. यावेळी त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. सरकारने मोठे प्रयत्न करून त्यांना भारतात आणले होते. भारतात परतल्यानंतर देशवासीयांनी मोठा जल्लोष केला होता.  आता चंदू चव्हाण यांनी भारत सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: मुलांसह खेळायला आलेल्या चिमुरडीसोबत शेजाऱ्याकडून नको ते कृत्य; डोंबिवलीत धक्कादायक प्रकाराने खळबळ

Nashik Crime News : घरमालकाच्या साडेतीन वर्षीय मुलासोबत तरुणाचं राक्षसी कृत्य, मनमाडमधील संतापजनक प्रकार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
Mumbai Dabbawala home: मोठी बातमी: मुंबईचे डबेवाले आणि चर्मकारांना सरकारचं मोठ्ठं गिफ्ट, 25 लाखात 500 चौरस फुटांचं घर मिळणार
मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला, मुंबापुरीत 25 लाखात 500 चौरस फुटांचं घरं, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं, 10 तोळ्याचा सोन्याचा हार नदीत वाहून गेला, भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँने प्रामाणिकपणा दाखवला
हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं, 10 तोळ्याचा सोन्याचा हार नदीत वाहून गेला, भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँने प्रामाणिकपणा दाखवला
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar Nikki Tamboli :  ''या घरात सगळ्यांना तू घाण झालीस...'';  जान्हवी आणि निक्कीत उडाला वादाचा भडका
''या घरात सगळ्यांना तू घाण झालीस...''; जान्हवी आणि निक्कीत उडाला वादाचा भडका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सLalbaugcha Raja Darshan Updates : राजाच्या दरबारी भक्तांची वर्गवारी, गरीब-श्रीमंत असा भेद100 Headlines : 100 हेडलाईन्स : बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 13 Sept 2024Sanjay Raut Full PC : विधानसभेला मविआ 170 ते  175 जागा जिकेल; राऊतांचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
Mumbai Dabbawala home: मोठी बातमी: मुंबईचे डबेवाले आणि चर्मकारांना सरकारचं मोठ्ठं गिफ्ट, 25 लाखात 500 चौरस फुटांचं घर मिळणार
मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला, मुंबापुरीत 25 लाखात 500 चौरस फुटांचं घरं, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं, 10 तोळ्याचा सोन्याचा हार नदीत वाहून गेला, भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँने प्रामाणिकपणा दाखवला
हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं, 10 तोळ्याचा सोन्याचा हार नदीत वाहून गेला, भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँने प्रामाणिकपणा दाखवला
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar Nikki Tamboli :  ''या घरात सगळ्यांना तू घाण झालीस...'';  जान्हवी आणि निक्कीत उडाला वादाचा भडका
''या घरात सगळ्यांना तू घाण झालीस...''; जान्हवी आणि निक्कीत उडाला वादाचा भडका
Investment Plan : चहा सोडा, करोडपती व्हा! नेमकं काय आहे गणित? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
चहा सोडा, करोडपती व्हा! नेमकं काय आहे गणित? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Delhi CM Arvind Kejriwal : तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
Nagpur Hit & Run case: नागपूर हिट अँड रन प्रकरणात लेकरु अडचणीत, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी अमित शाहांनाही काहीच बोललो नाही
मी मुलासाठी पोलिसांवर दबाव आणला नाही, अमित शाहांनाही काहीच बोललो नाही: चंद्रशेखर बावनकुळे
Embed widget