एक्स्प्लोर

Jalgaon News : लोकसभेसाठी जळगावातून भाजपकडून गिरीश महाजन यांना उमेदवारी देण्याची चर्चा, महाजन म्हणतात...

Jalgaon News : गिरीश महाजन यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची तयारी भाजपाने केली, अशी चर्चा रंगली आहे. त्यावर आता गिरीश महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Jalgaon News : भाजपचे संकटमोचक अशी ओळख असणाऱ्या ग्रामविकास मंत्री आणि जळगावातील (Jalgaon) पक्षाचे प्रमुख नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची तयारी भाजपाने (BJP) केली, अशी चर्चा रंगली आहे. त्यावर आता गिरीश महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "या सर्व खोट्या गोष्टी आहेत आहेत. मीही टीव्हीवरच बघतोय की माझं नाव खासदार म्हणून सुचवलं जातं आहे. असा कुठलाही विषय, चर्चा आणि निर्णय बैठकीत झालेला नाही, असं स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं. एबीपी माझाशी बोलताना गिरीश महाजन यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. 

एकनाथ खडसेंवर पलटवार

याचवेळी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. "तुम्ही माझ्यामागे मोका लावून चांगलं काम केलं," असं गिरीशी महाजन यांनी म्हटलं. "मी तर तुमच्यावर कुठलेही आरोप केलेले नाहीत, जे आरोप केले आहेत ते अंजली दमानिया यांनी केलेले आहेत म्हणूनच तुमची चौकशी झालेली आहे. आपला जावई जवळपास दोन-तीन वर्षापासून जेलमध्ये आहे, त्यांना जामीन मिळत नाही. आपलं कुटुंबीय कोर्टाने थांबवलं म्हणून सध्या बाहेर आहेत, त्याची कल्पना तुम्हाला आहे. म्हणून तुम्ही माझ्यावर तो मोका लावला तो कसा लावला त्याची कल्पना मला आहे. तुमच्या मागे ईडी लागली आहे, हे सर्व लोक बघत आहेत. त्याचे पुरावे देखील आहेत. दहा दहा वेळा सुप्रीम कोर्टात जाऊन तुम्हाला त्यात जामीन मिळत नाही. तुमचा जावई हा गरीब माणूस आहे तो तुमच्यामुळे अडकला आहे. तुमच्या स्वार्थापायी त्याला अडकवण्यात आलं याचं दुःख मलाही आहे," असा पलटवारही मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केला आहे.

जागावाटपावरुन युतीमध्ये वाद नाही

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपमध्ये (BJP) जागावाटपावरुन दावे प्रतिदावे होत आहे. याबाबत विचारलं असता गिरीश महाजन म्हणाले की, "आमच्या युतीमध्ये जागा वाटपाबाबत कुठलाही वाद नाही."

गौतमी पाटीलविषयी बोलणं टाळलं

तर सध्या महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत आणि वादात असणारी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) विषयावर बोलणं गिरीश महाजन यांनी टाळलं.

हेही वाचा

Nashik Girish Mahajan : भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांना नाशिकपासून दूर ठेवलं जातंय का? नव्या नेत्यांवर जिल्ह्याची जबाबदारी 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | जळगाव रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...Pushpak Express Accident पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या..नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी 'माझा'वरDevendra Fadnavis On Jalgaon | जळगाव अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 5 लाखाची मदतABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Embed widget