'काहींनी फक्त गरिबी हटावचे नारे दिले, मोदीजींनी गरिबांचे कल्याण केले'; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल
काँग्रेसने फक्त रिबी हटावचे नारे दिले. मोदींनी गरिबांचे कल्याण केले. २५ कोटी लोकांना गरिबी रेषेच्यावर आणण्याचे काम केले. काळ्या पैशावर मोदींनी प्रहार केला, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Devendra Fadnavis : काँग्रेसने (Congress) फक्त रिबी हटावचे नारे दिले. मोदींनी गरिबांचे कल्याण केले. २५ कोटी लोकांना गरिबी रेषेच्यावर आणण्याचे काम मोदींनी केले. काळ्या पैशावर मोदींनी प्रहार केला आहे, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. जळगाव येथील युवा संमेलनात ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदींनी विकसित भारताचे जे स्वप्न बघितले आहे. ते पूर्ण होणार आहे. गरिबी हटविण्याचे काम मोदींनी केले आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांना जमले नाही. काँग्रेसने फक्त गरिबी हटावचे नारे दिले. पण मोदींनी गरीब कल्याणचा अजेंडा आणला. २५ कोटी लोकांना गरिबी रेषेच्यावर आणण्याचे काम मोदींनी केले. गरिबांचे कल्याण केले. पाणी, वीज, घर देऊन अर्थव्यवस्थेचा विकास केला. काळ्या पैशावर प्रहार केला.
जपान, अमेरिकेला जमले नाही ते मोदींनी करून दाखविले
ते पुढे म्हणाले की, अर्थव्यवस्थेमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. पुढील चार वर्षात भारताची अर्थव्यवस्था जगातील तीन नंबरची अर्थव्यवस्था असणार आहे. मागील 25 वर्षात जे झाले नाही ते मोदींनी केले आहे. पुढील चार वर्षात अजून विकास होणार आहे. विदेशात जी ट्रेन आहे तीच सर्वसामान्य लोकांना दिली. रेल्वे स्टेशन विमानतळ सारखे तयार होत आहेत. बस पोर्ट तयार होत आहेत. लेह लद्धाख मध्ये गेलो तेव्हा मोदी सरकारने चांगले काम केले असे अधिकारी सांगत होते. चीन ने हल्ला केला तर 8 दिवस उत्तर देऊ शकत नव्हतो. चीन, पाकिस्तान कोणीही डोळे वटारून बघू शकत नाही. जपान, अमेरिकेला जमले नाही ते मोदींनी करून दाखविले. जगातील पहिल चंद्रयान आपण उतरवले.
तुमचे मत भाजपसाठी नाही तर भारतासाठी
सूर्याला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. हवामान पावसाची अचूक माहिती दिली जात आहे. जागतिक नेतृत्व नेते मोदी आहेत. कोरोना काळात लस दिली. विकासाची गडी मजबूत झाली आहे. मागील दहा वर्षात अर्थव्यवस्था बळकट केली. पुढील पाच वर्षात अजून अर्थव्यवस्था बकळत होईल. तुमचे मत भाजपसाठी नाही, भारतासाठी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या