मुक्ताईनगरमधील कार्यक्रम पत्रिकेवर एकनाथ खडसे, रक्षा खडसेंचे नाव वगळले, राजकीय वातावरण तापणार?
जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तापी नदीवरील पुलाचा शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांचे नाव वगळण्यात आले आहे.
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते तापी नदीवरील पुलाचा शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी छापली आहे. या पत्रिकेत भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) आणि एकनाथ खडसे (Eknath Shinde) यांचे नाव वगळण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत आयोजित भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमातून भाजप खासदार रक्षा खडसे आणि आ एकनाथ खडसे यांचे नाव वगळले आहे. शासकीय पत्रिकेत मात्र या दोघांची नावे घेण्यात आली आहेत.
मुक्ताईनगरमधील राजकीय वातावरण तापणार?
एकनाथ खडसे आणि आ चंद्रकांत पाटील यांच्यामधील राजकीय वैमनस्य सर्वशृत आहे. याच राजकीय वादातून आमदार चंद्रकांत पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांचे नाव पत्रिकेतून वगळल्याची चर्चा आता रंगली आहे. निमंत्रण पत्रिकेतून रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांचे नाव वगळल्याने मुक्ताईनगरमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर येथे विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी केले स्वागत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव विमानतळावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले. यावेळी आ. चंद्रकांत सोनवणे, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाशिम आणि जळगाव जिल्ह्याचा दौरा असून जळगाव विमानतळावरून ते हेलिकॉप्टर वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्या समवेत पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित आहेत.
...तर महिलांना 50 रुपये दंड
जळगावमध्ये (Jalgaon News) आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमासाठी महिला बचत गटातील महिलांनी उपस्थिती न लावल्यास पन्नास रुपये दंड आकारण्यात येणार आहे. महिला बचत गटांना यासाठी टार्गेट करण्यात आलं असून जर महिला बचत गटातील महिला शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपस्थित न राहिल्यास 50 रुपये दंड करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासंदर्भातील मेसेज आणि उलट सुलट प्रतिक्रिया आता जळगावमधील सोशल मीडिया ग्रुपमधून व्हायरल होत आहेत.
आणखी वाचा