Marathi Sahitya Sammelan : आजपासून 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; अमळनेरमध्ये भरणार सारस्वतांचा मेळा, ग्रंथदिंडीने सुरुवात
Jalgaon News : 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील सानेगुरुजी नगरी येथे सुरू होत आहे. दि. 02 ते 04 जानेवारीपर्यंत अमळनेरला सारस्वतांचा मेळा भरणार आहे.
Marathi Sahitya Sammelan जळगाव : 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (97th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan) आज शुक्रवारपासून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) येथील सानेगुरुजी नगरी येथे सुरू होत आहे. या साहित्य संमेलनाचा शुभारंभ सकाळी साडेदहा वाजता उद्घाटक सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan) यांच्या हस्ते होणार आहे तर संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रवींद्र शोभणे (Dr. Ravindra Shobhane) हे राहणार आहेत. या वेळी अनेक नामांकित साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, अनिल पाटील, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दि. 02 ते 04 जानेवारीपर्यंत अमळनेरला सारस्वतांचा मेळा भरणार आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आज सकाळी अमळनेरमध्ये ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीत अनेक साहित्यिक सहभागी झाले होते. संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि उद्योगपती अशोक जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटामाटात ग्रंथ दिंडी काढण्यात आली. अनेक नामवंत साहित्य यात सहभागी झाले. ग्रंथ दिंडीच्या निमित्ताने विविध चित्ररथ देखील साकारण्यात आलेले आहे. मंदिर संस्थानच्या कार्यकर्त्यांनी सकाळी या ठिकाणी शंखनाद देखील केला आहे.
संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शोभणे यांनी घेतला उखाणा
मराठी रसिक व साहित्यिकांच्या आग्रहास्तव डॉक्टर शोभणे यांनी आपल्या खास शैलीत उखाणा घेतला. डॉक्टर शोभणे यांच्या पत्नी अरुणा शोभणे यांना कवितेतून उखाणा सादर करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. डॉ. रवींद्र शोभणे यांचे अमळनेरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.
अमळनेरमध्ये दुसऱ्यांदा मराठी साहित्य संमेलन
पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1878 मध्ये पुणे शहरात झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष न्या. महादेव गोविंद रानडे होते. जळगाव जिल्ह्यात 1936 मध्ये मराठी साहित्य संमेलन झाले होते. माधव त्रिंबक पटवर्धन त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. 1952 मध्ये अमळनेरमध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झाले होते. त्यानंतर आता अमळनेर शहरात दुसऱ्यांदा हे संमेलन होत आहे. यापूर्वी, जळगाव शहरात 1984 मध्येही संमेलन झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्षस्थान शंकर रामचंद्र खरात यांनी भूषविले होते.
इतर महत्वाच्या बातम्या