एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
INDvsNZ | टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा सहा विकेट्सनी धुव्वा, लोकेश राहुल, श्रेयसची धडाकेबाज फलंदाजी
नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा विराट कोहलीचा निर्णय पुरता चुकला होता. सलामीवीर कॉलिन मुनरो आणि मार्टीन गप्टील या जोडीने सुरुवातीच्या षटकांपासून फटकेबाजी सुरु केली. त्या बळावर न्यूझीलंड संघाने दोनशेचा पल्ला गाठला मात्र टीम इंडियाच्या शिलेदारांनी विदेशी भूमिवर देखील आपली विजयाची परंपरा कायम राखली.
ऑकलंड : टीम इंडियानं न्यूझीलंडचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून, पाच ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात श्रेयस अय्यरचं धडाकेबाज अर्धशतक भारतासाठी निर्णायक ठरलं. त्यानं 29 चेंडूंत नाबाद 58 धावांची खेळी उभारली. श्रेयसच्या या खेळीला पाच चौकार आणि तीन षटकारांचा साज होता. लोकेश राहुलनं 27 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांसह 56 धावांची आणि विराट कोहलीनं 32 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह 45 धावांची खेळी उभारली. त्याआधी न्यूझीलंडनं या सामन्यात पाच बाद 203 धावांची मजल मारली होती. न्यूझीलंडकडून कॉलिन मुन्रो, केन विल्यमसन आणि रॉस टेलरनं अर्धशतकं झळकावली.
त्याआधी न्यूझीलंडनं ऑकलंडच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात पाच बाद 203 धावांची मजल मारली होती. कॉलिन मुन्रो, केन विल्यमसन आणि रॉस टेलरनं झळकावलेली अर्धशतकं न्यूझीलंडच्या डावात मोलाची ठरली. मुन्रोनं 59, विल्यमसननं 51 आणि टेलरनं नाबाद 54 धावांची खेळी केली. त्याआधी मुन्रो आणि गप्टिलनं दिलेल्या 80 धावांच्या सलामीनं न्यूझीलंडच्या डावाचा भक्कम पाया घातला होता. भारताकडून जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, शिवम दुबे आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
204 धावांचा पाठलाग करताना भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. मात्र यानंतर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी संयमी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. 56 धावांवर राहुल इश सोधीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र मोक्याच्या षटकांमध्ये विराट बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
संबंधित बातम्या
इंटरनेट सर्चमध्येही ठरला अव्वल, कोण आहे हा खेळाडू?
रोहित शर्माचा नवा विक्रम, जलद 9 हजार धावांचा टप्पा पार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement