Zika Virus: कानपूरमध्ये झिका विषाणू अनियंत्रित, 30 नवीन रुग्णांची नोंद, बाधितांची संख्या 66 वर
UP Zika Virus: कानपूरमध्ये (Kanpur) झिका विषाणूचा (Zika Virus) हल्ला वाढत आहे. एकाच वेळी 30 नवीन प्रकरणे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. येथील एकूण बाधितांची संख्या 66 वर पोहोचली आहे.
Kanpur Zika Virus: कानपूरमध्ये (Kanpur) झिका व्हायरसचा (Zika Virus) धोका वाढला आहे. कानपूरमध्ये गेल्या 24 तासांत झिका विषाणूचे 30 नवीन रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि आरोग्य विभागाचे संयुक्त पथक पोखरपूर, हरजिंदर नगर, श्याम नगर, ओम पूर्वा, तिवारीपूर येथे संयुक्त सर्वेक्षण करत असून अँटी-लार्व्हा फवारणीद्वारे झिका विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
बाधितांची संख्या 66 वर
कानपूरमध्ये झिका विषाणूचे 30 नवीन रुग्ण आढळले आहेत. नवीन प्रकरणे आल्यानंतर एकूण बाधितांची संख्या 66 वर पोहोचली आहे. पोखरपूरमधील आरोग्य विभाग सक्रिय असून अधिकारीही भेटी देत आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसोबतच टेहळणी पथकाने नमुने घेतले आहेत, स्रोत कमी करण्याची कारवाईही पूर्ण झाली आहे.
400 मीटर पर्यंत डासांची रेंज
एसीएमओ डॉक्टर आरएन सिंह यांनी सांगितले की, पहिली केस पोखरपूरचा रहिवासी आणि हवाई दलात कार्यरत एमएम अलीची होती. घराच्या मागे ब्रीडिंग ठिकाणे दिसली जी मोठ्या प्रमाणात आढळून आली. त्यांनी सांगितले की या डासाची रेंज 400 मीटर पर्यंत आहे आणि ज्याला कोणाला चावतो त्याला झिका व्हायरसची लागण होते. यासाठी, स्त्रोत कमी करण्याच्या सुमारे 100 टीम गुंतल्या आहेत. फोकल स्प्रेच्या 100 पथके आणि 100 निगराणी पथकेही कार्यरत आहेत.
सखोल फॉगिंग करण्यात येतंय
डॉक्टर आरएन सिंह यांनी सांगितले की, पोखरपूर परिसरातच 17 नवीन संक्रमित समोर आले आहेत. जे 3 किमी रेडियसमध्ये कार्यरत आहे. 100 टीम पोखरपूर, हरजिंदर नगर, श्याम नगर, ओम पूर्वा, न्यू आझाद नगर, शिव कटरा, लाल कुर्ती, तिवारीपूर, बगिया भागात कार्यरत आहेत, जे प्रतिबंधात्मक कार्य करत आहेत. डासांची ठिकाणं स्वच्छ पाण्यात असून दिवसा चावतात हे घरोघरी समजावून सांगितले जात आहे. लोकांनी घाबरण्याची गरज नाही, त्यांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. ते म्हणाले की, महापालिकेकडून सखोल फॉगिंग करण्यात येत आहे.