एक्स्प्लोर
आधी वडिलांचा गळा कापला, नंतर फेविक्विकने चिकटवण्याचा प्रयत्न
ज्यावेळी आरोपी मुलाला कळलं की, आता हे सारं प्रकरण अंगाशी येत आहे, तेव्हा मग त्याने वडिलांना त्याच अवस्थेत सोडून घटनास्थळावरुन पळ काढला.
लखनौ : वडिलांचा गळा कापल्यानंतर, मुलाने फेविक्विकने गळा चिकटवण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशातील बस्तीमध्ये अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या जखमी वडिलांवर उपचार सुरु असून, आरोपी मुलगा फरार आहे.
बस्ती जिल्ह्यातील सोनवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रामदेव नामक व्यक्ती मुलासोबत राहतो. पत्नीचं निधन झालं आहे. जोपर्यंत रामदेव रेल्वेमध्ये काम करत होते, घरी पैसा आणत होते, तोपर्यंत घरातही त्यांचा मान राखला जायचा. मात्र निवृत्त झाल्यानंतर ते आजारी पडले आणि त्यांच्या हालअपेष्टांना सुरुवात झाली.
शनिवारी रात्री ते घरी आले, त्यावेळी मुलगा जगदीशने त्यांचा गळा कापला. जखमी अवस्थेतील वडिलांचा आवाज बाहेर कुणाला ऐकायला जाऊ नये म्हणून मुलाने टीव्हीचा आवाज मोठा केला. त्यानंतर आपण पकडले जाऊ असे कळल्यावर, त्या भितीने त्याने फेविक्विकने वडिलांचा कापलेला गळा चिकटवून जोडण्याचा प्रयत्न केला.
ज्यावेळी आरोपी मुलाला कळलं की, आता हे सारं प्रकरण अंगाशी येत आहे, तेव्हा मग त्याने वडिलांना त्याच अवस्थेत सोडून घटनास्थळावरुन पळ काढला.
वडील रामदेव यांनी मदतीसाठी याचना केली. त्यावेळी त्यांचा आवाज शेजाऱ्यांना ऐकू आला आणि शेजाऱ्यांनी जमिनीवर जखमी अवस्थेत पडलेल्या रामदेव यांना हॉस्पिटलमध्ये नेले.
धक्कादायक म्हणजे, आरोपी मुलगा जगदीशने 2005 साली त्याच्या पहिल्या पत्नीची हत्या केली होती, अशी माहितीही आता उघड झाली आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा लग्न केलं होतं. त्यामुळे आरोपी मुलगा हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, सध्या आरोपी मुलगा जगदीश फरार असून, पोलिस त्याचा तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement