एक्स्प्लोर
Advertisement
जवानांनी बोनेटवर बांधलेला तरुण म्हणतो....
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्हिडीओ समोर येत आहेत. आधी सीआरपीएफच्या जवानांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या फुटीरतावाद्यांचा व्हिडीओ समोर आला.
त्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दुसरा व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओत जवानांवर कथित दगडफेक करणाऱ्या तरुणाला, सीआरपीएफने आर्मी जीपच्या बोनेटवर बसवून, त्याची धिंड काढली. आरोपीच्या कारवाईला विरोध होऊ नये तसंच गाडीवर दगडफेक होऊ नये, म्हणून सीआरपीएफने ही नामी शक्कल लढवली.
मात्र आता सीआरपीएफने बोनेटवर बांधलेल्या तरुणाचं मत 'इंडियन एक्स्प्रेस'ने जाणून घेतलं.
'मी दगडफेक केली नाही'
जीपच्या बोनेटवर बांधलेल्या 26 वर्षीय तरुणाचं नाव फारुक अहमद धर आहे. "मी कोणतीही दगडफेक केली नाही. मी काश्मीरमध्ये रोजी-रोटीसाठी छोटा-मोठा रोजगार करतो", असा दावा फारुकने केला आहे.
"त्या दिवशी मी एका नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी जात होतो. मात्र रस्त्यातच प्रदर्शन सुरु होतं. ते पाहून मी थांबलो. मात्र थोड्याच वेळात सीआरपीएफचे जवान आले आणि मला पकडलं. त्यांनी मला मारतच जीपच्या बोनेटवर बसवलं. त्यांनी मला 9 गावात फिरवून सीआरपीएफच्या कँम्पमध्ये नेलं. तिथे माझे हात सोडून मला कॅम्पमध्येच ठेवलं", असाही दावा फारुकने केला आहे.
फारुकच्या दाव्यानुसार, दोन सीआरपीएफचे जवान गाडीतून ओरडत होते की "या आता तुमच्याच माणसावर दगड मारा"
फारुक त्याच्या 75 वर्षीय आईसोबत राहतो. तो जवानांना झालेल्या मारहाणीत किंवा दगडफेकीत होता की नाही याबाबत अद्याप अस्पष्ट आहे.
मात्र जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येक संकटावेळी धावून येणाऱ्या जवानांवरच जर कोणी हात उचलत असेल, तर त्यांना जरब बसवायलाच हवी, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटत आहेत.
संबंधित बातम्या
EXCLUSIVE : काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना पाककडून ‘कॅशलेस फंडिंग’
VIDEO : दगडफेक रोखण्यासाठी जवानांनी काश्मिरी तरुणाला जीपवर बांधलं!
जवानांवर हात उचलणाऱ्या नराधमांची ओळख पटली
श्रीनगरमध्ये फुटीरतावाद्यांचं CRPF जवानांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
एका थप्पडच्या बदल्यात 100 जिहादींना ठार करा : गंभीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
धाराशिव
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement