Yogi Adityanath Oath Ceremony : 'मैं ईश्वर की शपथ लेता हूं...' योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, दिग्गजांची उपस्थिती
Yogi Adityanath Oath Ceremony : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी पर्वाला सुरुवात झाली आहे. योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
Yogi Adityanath Oath Ceremony : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी पर्वाला सुरुवात झाली आहे. योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. इकाना स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. दरम्यान, गुरुवारी योगी आदित्यनाथ यांची एकमताने विधीमंडळ नेतेपदी निवड झाली. योगी आदित्यनाथ यांची विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता. उत्तर प्रदेशच्या इतिहासात तीन दशकांहून अधिक काळानंतर अशी संधी चालून आली आहे, की एखाद्या मुख्यमंत्र्यांने दुसऱ्या टर्मची पुनरावृत्ती केली. भाजपला मिळालेल्या मोठ्या जनादेशामुळे हे सर्व शक्य झाले आहे. त्यामुळं या ऐतिहासिक विजयानंतर योगींचा आज शपथविधी सोहळाही ऐतिहासिक ठरला आहे.
Lucknow | BJP's Yogi Adityanath takes oath as the Chief Minister of Uttar Pradesh for the second consecutive term. pic.twitter.com/ubAZ5nHTB4
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 25, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप प्रदेक्षाध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिसवा सरमा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री एमएल खट्टर, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गज भाजप नेते उपस्थित होते.
योगींच्या मंत्रिमंडळात कुणाला स्थान -
केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 9 वेळा आमदार राहिलेले सुरेश कुमार खन्ना यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. सूर्य प्रताप शाही, स्वतंत्र देव सिंह, बेबी रानी मौर्य, चौधरी लक्ष्मीनारायण यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. भुपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभोर, जितेन प्रसाद, राकेश साचेन, जयवीर सिंह, धरम पाल सिंह, नांद गोपाल गुप्ता यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.