Bharat Biotech Covid Vaccine: कोवॅक्सिन लसीला आठवडाभरात WHO ची मंजुरी मिळण्याची शक्यता
भारत बायोटेकची लस कोवॅक्सिनला (Covaxin) WHO कडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सध्या फायझर, अॅस्ट्राझेनेका, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन, सिनोवॅक आणि सिनोफार्म या लसींना WHO ने मंजुरी मिळाली आहे.
Bharat Biotech Covid Vaccine: जागतिक आरोग्य संघटना (WHO) या आठवड्यात भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधात्मक लस कोवॅक्सिनला (Covaxin) मंजुरी देऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार ही बातमी समोर आली आहे. Covaxine ला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून इमर्जन्सी वापरासाठीच्या यादीत स्थान मिळालं नाही.
भारत बायोटेकने चाचणीशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे आणि डेटा जुलै महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेला उपलब्ध करून दिला होता. आता सूत्रांचे म्हणणे आहे की WHO या आठवड्यात भारत बायोटेकच्या लसीला परवानगी देऊ शकते.
आपत्कालीन वापरासाठी तज्ञांकडून या लसीचे पुनरावलोकन केले जात होते. WHO च्या दक्षिण-पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी जुलैमध्ये सांगितले की एक तज्ज्ञ समिती डोजियरचा आढावा घेत आहे.
World Health Organisation (WHO) nod for Bharat Biotech's #COVID19 vaccine, Covaxin is expected this week: Sources pic.twitter.com/IYE9qkfHtb
— ANI (@ANI) September 13, 2021
फायझर, अॅस्ट्राझेनेका, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन, सिनोवॅक आणि सिनोफार्म यांना WHO ने आपत्कालीन वापर यादीत (EUL) जागा दिली आहे. WHO च्या आपत्कालीन वापराच्या यादीत कोवॅक्सिन लसीला जागा मिळावी अशी मागणी भारत बायोटेकने केली आहे. याबाबत WHO ने आधीच कंपनीसोबत चर्चा केली आहे.
जानेवारी महिन्यात Covaxin ला भारतात वापरण्यास मंजुरी
काही दिवसांपूर्वी भारत बायोटेकने मेड इन इंडिया कोविड -19 लसीच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी डेटा DCGI ला सादर केला आहे. याआधी, डीसीजीआयने फेज I आणि फेज II ट्रायल डेटाच्या आधारे जानेवारी महिन्यात भारतात कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली होती. ही चाचणी भारतात 25 ठिकाणी करण्यात आली.
इतर बातम्या