CISF And CRPF Work : देशात कुठे CISF सुरक्षा पुरवते, तर कुठे CRPF, 'या' दोन्ही सुरक्षा दलाच्या कामाचे स्वरूप समजून घ्या!
CISF And CRPF Work : तुम्ही पाहिलं असेल की देशात वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षेसाठी CISF आणि CRPF या सुरक्षा दलाला तैनात केलं जातं. हे दोन्ही सुरक्षा दल देशांतर्गत शांतता राखण्यासाठी देशाची सेवा करत असतात.
CISF And CRPF Work : आपल्या देशाची सुरक्षा फक्त सीमेच्या सुरक्षेवर अवलंबून नाही. आपली देशांतर्गत शांतता आणि सुरक्षासुद्धा खूप महत्त्वाची आहे. तुम्ही पाहिलं असेल की, देशातील साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात केलेल्या असतात. जसे की रेल्वे जंक्शन, मेट्रो स्टेशन आणि विमानतळ इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा दलाचे सैनिक डोळ्यात तेल घालून दिवस-रात्र देशाच्या संपत्तीचे रक्षण करतात. यामध्ये काही ठिकाणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि केंद्रीय राखीव दलातील (CRPF) सैनिकांच्या तुकड्या तैनात केल्या जातात. या दोन्ही सुरक्षा दलावर देशातील नागरिक, सार्वजनिक सुरक्षा आणि सार्वजनिक संपत्तीच्या सुरक्षा व्यवस्थेची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली असते. अशातच दोन्ही सुरक्षा दलाच्या कामाच्या स्वरूपात फरक समजून घेऊया.
केंद्रीय राखीव दल (CRPF) आणि कार्ये :
सीआरपीएफ याचा अर्थ केंद्रीय राखीव दल आहे. या राखीव दलातील सैनिक संपूर्ण देशात कर्तव्यतत्पर असते. देशांतर्गत ओढवलेल्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सीआरपीएफचे सैनिक महत्त्वाची भूमिका पार पाडतात. देशात एखाद्या भागात दंगलीसारखी स्थिती असेल किंवा एखाद्या संवेदनशील भाग असेल इत्यादी ठिकाणी सुरक्षा दलाच्या तुकडीला तैनात केलं जातं. देशावरील कोणत्याही दहशतवादी हल्ल्यापासून ते नैसर्गिक आपत्तीपर्यंत सीआरपीएफच्या सैनिकांचा महत्त्वाचे महत्वाचे योगदान असते. जसे की गर्दीला नियंत्रित करणे, दंगल नियंत्रित करणे, दहशतवादी हल्ला हाणून पाडणे, दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन करणे, नक्षलवादी आणि दहशतवाद्यांचा सामना करणे, युद्धकाळात लढाई करणे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत कार्य उभं करणे आणि हिंसक क्षेत्रात शांतता प्रस्थापित करणे इत्यादी कामांचा समावेश आहे. याशिवाय निवडणुकीच्या काळातही सीआरपीएफचे सैनिक महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि कार्य :
सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून देशातील साधन-संपत्तीची सुरक्षा केली जाते. हे एक निमलष्करी दल आहे. सद्यस्थितीत सीआयएसएफ देशातील 355 आस्थापनांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडते. सीआयएसएफ देशातील सरकारी उद्योग, कारखाने आणि सरकारी उपक्रमांना सुरक्षा प्रधान करते. याशिवाय देशातील विविध प्रकारच्या साधन संपत्तीच्या संरक्षाणाची जबाबदारी पार पाडते. जसे की, विमान तळ, बंदर आणि पावर प्लांट इत्यादी. याशिवाय ऐतिहासिक स्मारके आणि दिल्ली मेट्रो स्टेशनला सुरक्षा प्रधान केली जाते. यासोबत काही व्हिआयपी व्यक्तींनाही सुरक्षा पुरवली जाते.