Women Fight : बसमध्ये महिलांची फ्री-स्टाईल हाणामारी, सीटसाठी WWE फाईट; व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
Delhi Women Bus Fight : सीटसाठीचा महिलांचा वाद तुंबळ हाणामारीपर्यंत पोहोचला. दिल्ली बसमधील या महिलांच्या फ्री-स्टाईल मारामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Delhi Women Bus Fight : अनेकदा दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro) भांडणं आणि मारामारीचे (Fight) व्हिडीओ (Video) सोशल मीडिया (Social Media) वर व्हायरल होत असतात. पण, हे ही परिस्थिती फक्त दिल्ली मेट्रोमध्येच नाही तर बसमध्येही पाहायला मिळत आहे. दिल्ली सरकारी बसमध्ये महिलांच्या तुफान हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. सीटच्या वादावरून सुरु झालेला हा वाद अगदी बुक्यांच्या मारामारीपर्यंत पोहोचला. दिल्ली बसमधील महिलांच्या फ्री-स्टाईल राड्याचा या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्याही अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
बसमध्ये महिलांची फ्री-स्टाईल हाणामारी
दिल्लीतील सरकारी बसमधील (Delhi Govt. Bus) एक नवीन प्रकरण सध्या चर्चेत आहे. याचा एक व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये स्त्रिया बसमधील सीटसाठी भांडताना दिसत आहेत. या भांडणामध्ये शिवीगाळ करण्यापासून ते बुक्क्यांच्या मारहाणापर्यंत सर्व काही पाहायला मिळत आहे. महिलांच्या WWE फाईटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आणि तो लगेचच व्हायरल झाला. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओ मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींनी या घटनेवर टीका करत निषेध व्यक्त केला आहे.
सीटसाठी महिलांची तुंबळ हाणामारी
'DELHIBUSES1' हँडलद्वारे ट्विटर X सोशल मीडिया साइटवर हा महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ''#दिल्ली बसेसमध्ये तुमचे नेहमीच स्वागत आहे. तुम्ही कधी दिल्लीच्या बसने प्रवास केला असेल तर तुमचा अनुभव सांगा.'' हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ रिपोस्ट आणि शेअर करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पाहा व्हायरल व्हिडीओ :
#दिल्ली की बसों में सदैव आपका स्वागत है आपने कभी दिल्ली की बसों में यात्रा करी है तो अपना अनुभव बताए। @gharkekalesh @gharkekaleshh @ShoneeKapoor @moronhumor @GabbbarSingh @Being_Sanskaari @ChillamChilli @TheViralFever @delhichatter @Prof_Cheems @ajaychauhan41 #delhi pic.twitter.com/ETQ78ec1w5
— Delhi Buses (@DELHIBUSES1) October 24, 2023