एक्स्प्लोर

विलासरावांना जमलं ते गिरीश महाजनांना का नाही?

अण्णांनी 2011 साली जनलोकपाल आंदोलन केलं तेव्हा तो प्रश्न तत्कालिन दिवंगत केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केवळ दोन भेटीत सोडवला होता.

नवी दिल्ली : जनलोकपालसह इतर मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं सहाव्या दिवशीही दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण सुरुच आहे. हे आंदोलन हाताळण्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे अण्णा दिल्लीत जाण्याच्या अगोदरपासूनच त्यांच्या सोबत आहेत आणि मागण्यांवर चर्चा करत आहेत. गिरीश महाजन हे सुरुवातीपासून अण्णांसोबत असले तरी अजून ते यावर तोडगा काढू शकलेले नाहीत. त्यामुळे ते सतत अपयशी का ठरत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अण्णांनी 2011 साली जनलोकपाल आंदोलन केलं तेव्हा तो प्रश्न तत्कालिन दिवंगत केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केवळ दोन भेटीत सोडवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह या जोडीने अण्णांचं आंदोलन हाताळण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर दिल्याचं दिसत आहे. मात्र भाजपकडे विलासरावांसारखा एकही नेता नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, तीन वेळा चर्चा करुनही गिरीश महाजनांची शिष्टाई निष्फळ ठरली. विलासरावांनी 2011 सालच्या आंदोलनात काय केलं होतं? अण्णांनी जनलोकपालच्या मागणीसाठी रामलीलावर 2011 साली अनिश्चित काळासाठी उपोषण सुरु केलं. आंदोलन सुरु झालं तेव्हा विलासराव देशमुख श्रीलंकेत होते. रामलीलामध्ये आंदोलन हाताबाहेर जात होतं. त्यामुळे, अण्णांची आंदोलनं हाताळण्याचा अनुभव विलासरावांना आहे, असा सल्ला तत्कालिन कृषीमंत्री शरद पवारांनी अर्थमंत्री असलेल्या प्रणव मुखर्जी यांना सल्ला दिला. अण्णांच्या टीममध्ये असलेले अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी प्रत्येक बैठकीत वाद घालत होते, ज्यामुळे बोलणी फिसकटत होती. एका बैठकीत प्रणव मुखर्जींनी किरण बेदींना झापलं होतं, असंही बोललं जातं. त्यानंतर मनमोहन सिंहांनी विलासरावांना मध्ये घातलं आणि चर्चा सुरु झाली. विलासराव माध्यमं, किरण बेदी आणि केजरीवालांना चुकवून अण्णांना भेटले. सुरेश पाठारे हे रामलीलावरुन मेसेज घेऊन जायचे. हे उपोषण तब्बल अकरा दिवस चाललं होतं. विलासराव असे सारखे चर्चेचं गुऱ्हाळ घालत बसले नाहीत. ते अण्णांना केवळ दोन वेळा भेटले. जंतरमंतर मैदानावर पहिल्यांदा आले तेव्हा, अण्णा तुम्हाला काय हवंय असं विचारून घेतलं. त्यानंतर ते थेट तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना भेटले. मनमोहन सिंह यांच्याकडे या मागण्यांबाबत चर्चा केल्यावर ते तत्कालिन विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांना आणि इतर विरोधी नेत्यांनाही लुपमध्ये ठेवून आंदोलनातल्या मागण्यांवर सर्व सहमतीने काय करता येईल हे ठरवलं. त्यानंतर दुसरी भेट थेट केंद्राचं पत्र घेऊनच झाली. अण्णांनी या मागण्यांवर सहमत असल्याचं सांगितलं आणि उपोषण अकरा दिवसांनी मागे घेतलं. फरक फक्त एवढाच आहे, की विलासरावांना थेट मनमोहन सिंहांपर्यंत जाण्यासाठी अॅक्सेस होता आणि गिरीश महाजन पंतप्रधान कार्यालयाशी संपर्कात आहेत. 2011 साली जनलोकपालसाठी आग्रही असणारे मोदी आता त्यांच्याच हातात सत्ता असताना दुर्लक्ष का करत आहेत, हा चर्चेचा विषय बनला आहे. गिरीश महाजनच का? अण्णांच्या आंदोलनातले विषय हे केंद्राच्या अखत्यारितील आहेत. मात्र राज्यातले मंत्री चर्चा करत आहेत. गिरीश महाजन यांच्याकडे राज्यातल्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी आहे, अधिवेशन सुरुय, तरीही ते गेल्या सहा दिवसांपासून दिल्लीत आहेत. केंद्राकडे एक वजनदार मराठी मंत्री म्हणून नितीन गडकरींचा पर्याय होता, पण गडकरींची पार्श्र्वभूमी आणि त्यांची कार्यशैली पाहता तो पर्याय भाजपला वापरता आला नाही. अण्णा-गडकरी हे संबंध फारसे बरे नाहीत, असंही बोललं जातं. संबंधित बातम्या :

रामलीलावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं आऊटपुट भाजप कार्यालयात?

अण्णांनी केंद्राच्या मसुद्यात त्रुटी दाखवल्या, उपोषण लांबणार : सूत्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget