एक्स्प्लोर

Cough Syrup : भारतातील 'हे' कफ सिरप धोकादायक! WHO कडून धोक्याचा इशारा; इराकने घातली बंदी

WHO Warns Against Indian Cough Syrup : भारतातील कोल्ड आऊट (Cold Out) हे कफ सिरप (Cough Syrup) धोकादायक असल्याचं WHO नं म्हटलं आहे.

Cold Out Cough Syrup : खोकल्याच्या उपचारासाठी तुम्ही कोणतेही कफ सिरप वापरत असाल तर काळजी घ्या. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एका भारतीय कफ सिरपबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. भारतातील कोल्ड आऊट (Cold Out) हे कफ सिरप (Cough Syrup) धोकादायक असल्याचं WHO नं म्हटलं आहे. कोल्ड आऊट, भारतात बनवलेले कफ सिरपबद्दल WHO धोक्याचा इशारा दिला असून हे कफ सिरप कमी दर्जाचं असल्याचं म्हटलं आहे. या भारतीय कफ सिरपवर इराकमध्ये बंदी घालण्यात आली आहे. याआधीही भारतात बनवलेल्या अनेक कफ सिरपवर इतर देशात बंदी घालण्यात आली आहे.

भारतातील कोल्ड आऊट कफ सिरप धोकादायक

पॅरासिटामॉल आणि क्लोरफेनिरामाइनच्या मिश्रणातून बनवलेले कफ सिरप हे सामान्य सर्दी, खोकला आणि ऍलर्जीच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी वापरलं जातं. पण कोल्ड आऊट हे कफ सिरप सुरक्षितता आणि गुणवत्तेबाबत WHO ने ठरवलेल्या मानकांपासून वेगळं आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इराकमध्ये नुकतेच बंदी घालण्यात येणारे खोकल्याचं औषध कोल्ड आऊट (Cold Out) फोर्ट्स इंडिया लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेडसाठी Dabilife Pharma Pvt Ltd ने तयार केलं आहे. 

कफ सिरपमध्ये काय आढळलं?

डब्ल्यूएचओने आपल्या अहवालात म्हटले आहे की, या कफ सिरपमध्ये एथिविन ग्लायकोल आणि डायथिलीन ग्लायकोल या दोन्ही घटकांची मात्रा ठराविक मर्यादेपेक्षा 0.10 टक्के अधिक आहे. हे कोणासाठीही धोकादायक ठरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, या औषधाचा वापर लोकांचे आरोग्य गंभीरपणे बिघडवू शकत नाही तर मृत्यू देखील होऊ शकतो.

भारतीय कफ सिरपवर याआधीही प्रश्न उपस्थित

सर्वात आधी, ऑक्टोबर 2022 मध्ये गांबियामध्ये 70 मुलांचा मृत्यू झाला तेव्हा ते हरियाणाच्या मेडेन फार्माने तयार केलेल्या कफ सिरपशी यांचा संबंध जोडला गेला होता. त्यावेळीही WHO ने या वैद्यकीय उत्पादनाबाबत अलर्ट जारी केला होता. यानंतर, डिसेंबर 2022 मध्ये, उझबेकिस्तान सरकारने येथे 18 मुलांच्या मृत्यूसाठी मेरियन बायोटेक लिमिटेड जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एप्रिल 2023 मध्ये, WHO ने मार्शल आयलंड आणि मायक्रोनेशियामध्ये विकल्या जाणाऱ्या QP फार्माकेमच्या सिरपवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यानंतर, जून 2023 मध्ये कॅमेरूनमध्ये काही मुलांचा मृत्यू झाला, तेव्हा त्याचा संबंध भारतात बनवलेल्या कफ सिरपशीही जोडला गेला.

संबंधित इतर बातम्या : 

Cough Syrup : भारतनिर्मित आणखी एक कफ सिरप दूषित असल्याचा WHO चा दावा, अलर्ट जारी; पंजाबमधील कंपनीने आरोप फेटाळाले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 24 January 2025Job Majha : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलमध्ये नोकरीची संधी; शैक्षणिक पात्रता काय?Mamta Kulkarni takes 'sanyaas' at Mahakumbh : ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, महाकुंभ मेळ्यामध्ये स्वीकारली संन्यासाची दीक्षा100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 25 January 2025 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
Embed widget