Eris Covid Strain : WHO कडून 'एरिस' कोविड स्ट्रेनचे 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून वर्गीकरण; भारतात एका प्रकरणाची नोंद
Eris Covid Variant : हा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक नाही असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.
Eris Covid Variant : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी (9 ऑगस्ट) युनायटेड स्टेट्स आणि चीनमध्ये पसरणाऱ्या EG.5 कोरोनाव्हायरस स्ट्रेनचे वर्गीकरण "व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट" म्हणून वर्गीकरण केले. पण, हा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक नाही असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, हा व्हेरिएंट इतर कोरोनाच्या व्हेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक नाही. यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या मते, 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' पूर्वीच्या संसर्ग किंवा लसीकरणादरम्यान निर्माण झालेल्या अँटीबॉडीजशी संबंधित आहे. संसर्गाचा प्रभाव, क्लिनिकल प्रभाव आणि संभाव्य उपचार, किंवा संक्रमणाचा प्रसार किंवा रोगाची तीव्रता वाढविण्याच्या संबंधित आहेत.
WHO च्या बैठकीत अधिका-यांनी सांगितले आहे की, आतापर्यंत एरिस स्ट्रेनचे फारसे पुरावे आढळलेले नाहीत. म्हणूनच या क्षणी हा एक गंभीर आजार मानला जाऊ शकत नाही. वेळेनुसार जसजसे पुरावे समोर येतील त्याप्रमाणे आम्ही माहिती देऊ.
डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की, जगात आतापर्यंत EG.5 आणि त्याच्या व्हेरिएंटचे फारच कमी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मात्र, या व्हेरिएंटची संख्या यूके आणि यूएसमध्ये लक्षणीय आहे. तर, भारतात मे महिन्यात एक केस आढळली होती.
पुण्यातून नोंदवलेले EG.5 प्रकरण
SARS-CoV-2 चे EG.5 किंवा Aris व्हेरिएंट या वर्षी सर्वात आधी 17 फेब्रुवारी रोजी नोंदवले गेले आणि 19 जुलै रोजी देखरेखीखाली एक व्हेरिएंट (VUM) म्हणून घोषित करण्यात आले. WHO ने बुधवारी EG.5 आणि त्याचे उप-फॉर्म VOI म्हणून नियुक्त केले. त्यात म्हटले आहे की, EG.5 हे Omicron format XBB.1.9.2 चा एक प्रकार आहे. या वर्षी मे महिन्यात पुण्यातून आतापर्यंत भारतात EG.5 चे फक्त एक प्रकरण नोंदवले गेले आहे.
मार्च 2020 मध्ये या प्रादुर्भावाला महामारी म्हणून घोषित करण्यात आले
WHO नुसार, जागतिक स्तरावर, EG.5 च्या प्रमाणात सातत्याने वाढ झाली आहे. एपिडेमियोलॉजिकल वीक 29 (17 ते 23 जुलै 2023) दरम्यान, EG.5 चा जागतिक प्रसार 17.4 टक्के होता. वेगाने पसरणारा प्रकार, युनायटेड स्टेट्समध्ये अंदाजे 17% प्रकरणांसह वेगाने पसरत चालला आहे. याशिवाय चीन, दक्षिण कोरिया, जपान आणि कॅनडामध्येही हे काही प्रकरण आढळून आले आहे. कोविड 19 ने जागतिक स्तरावर 6.9 मिलियनहून अधिक लोकांचा जीव घेतला. WHO ने मार्च 2020 मध्ये या उद्रेकाला साथीचा रोग घोषित केला.
महत्त्वाच्या बातम्या :