एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mulayam Singh Yadav Died : जेव्हा मुलायम सिंह आणि कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात महाविकास आघाडी करत भाजपला धोबीपछाड दिला होता!

Mulayam Singh Yadav Died : समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे आज निधन झाले. मुलायम सिंह यादव यांच्याशी संबंधित असे किस्से आहेत, जे खूप अविस्मरणीय आहेत

Mulayam Singh Yadav Died : समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे आज निधन झाले. मुलायम सिंह यादव यांच्याशी संबंधित असे अनेक किस्से आहेत, जे खूप अविस्मरणीय आहेत आणि ते कोणत्या प्रकारचे नेते होते ते सांगतात. 1990 मध्ये दलित नेते आणि बसपा संस्थापक कांशीराम यांच्यासमवेत मुलायम सिंह यादव यांनी भाजपचा विजय रथ रोखला होता. तो सुद्धा रंजक किस्सा आहे. मुलायम सिंह यादव आणि कांशीराम यांना एकत्र करणे इतके सोपे नव्हते. पण त्यावेळचे प्रसिद्ध उद्योगपती जयंत मल्होत्रा ​​यांनी दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

खरे तर 1990 च्या दशकात रामजन्मभूमी आंदोलन शिगेला पोहोचले होते आणि उत्तर प्रदेशात भाजप सरकार होते. मुलायम सिंह यादव आणि कांशीराम या दोघांनाही भाजपला सत्तेवरून हटवायचे होते, पण ते त्यांच्यासाठी सोपे नव्हते. दरम्यान, 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद कोसळली आणि त्यानंतर केंद्र सरकार उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करणार होते. मात्र कल्याण सिंह यांनी यापूर्वीच राजीनामा दिला होता, त्यामुळे भाजपचे सरकार कोसळले.

भेट यशस्वी अन् आघाडी नंतर महाविकास आघाडी 

भाजपचे सरकार कोसळल्यानंतर पुन्हा निवडणुका होणार होत्या आणि जनतेचा मूड पाहता भाजपला एकट्याला रोखणे कोणत्याही पक्षासाठी कठीण होते. उद्योगपती जयंत मल्होत्रा ​​यांनी मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली आणि कांशीराम आणि मुलायम सिंह यादव यांना अशोका हॉटेलमधील त्यांच्या खोलीत भेटायला लावले. दोघांची भेट यशस्वी झाली आणि येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. त्यानंतर समाजवादी पार्टी आणि बसपा यांच्यात आघाडी झाली.

ही युती कधीच वैचारिक नसली तरी ती केवळ धोरणात्मक युती होती, ज्याचा उद्देश भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी होता, पण मुलायमसिंह यादव आणि कांशीराम या दोघांनीही एकमेकांना मतांचे हस्तांतरण होईल, असे आश्वासन दिले. कांशीराम इटावामधून तर मुलायम सिंह यादव यांनी जसवंत नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 1993 च्या विधानसभा निवडणुकीत सपा-बसपा युतीला एकूण 176 जागा मिळाल्या. मात्र, या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या युतीला बहुमत मिळाले नाही. मात्र अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन करून भाजपला रोखण्याचा दोन्ही नेत्यांचा मनसुबा पूर्ण झाला.

मायावती आघाडीपासून दूर राहिल्या 

मात्र, मायावतींना या आघाडीपासून दूर ठेवण्यात आले आणि केवळ कांशीराम सभांमध्ये सहभागी होत असत. तेव्हा मायावतींनी पश्चिम उत्तर प्रदेशातील ज्या भागात दलितांची संख्या जास्त होती, त्या भागातच प्रचार केला. बीबीसीच्या एका वृत्तानुसार, अजय बोस मायावतींच्या चरित्रात लिहितात, "लखनऊमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यातील आघाडी सरकारचा अर्थ कांशीराम, मुलायम सिंह यादव आणि मायावती यांच्यासाठी वेगळ्या गोष्टी होत्या. कांशीराम यांच्यासाठी दलित, मागास जाती आणि मुस्लिमांना एका व्यासपीठावर आणण्याची मोहीम पूर्ण करण्याच्या दिशेने एक मोठी झेप होती.

आघाडी आणि दोन्ही पक्षांमधील संशयकल्लोळ

मायावतींनी आघाडीत ढवळाढवळ सुरू केल्यानंतर मुलायम सिंह अस्वस्थ झाले होते. दुसरीकडे समाजवादी पक्ष आणि मुलायम सिंह यादव हे आपले आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे बसप नेत्यांना वाटत होते. मुलायम सिंह यादव यांना सत्तेवरून हटवण्यासाठी कांशीराम यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्याशीही संपर्क साधला होता, असेही म्हटले जाते.  त्याचवेळी कांशीराम आणि मायावती यांनी मुलायम सिंह यादव यांच्यासमोर असे काही प्रस्ताव ठेवले होते, जे स्वीकारणे त्यांना शक्य नव्हते आणि नंतर ही युती तुटली, असे समाजवादी पक्षाच्या नेत्यांचे मत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Embed widget