एक्स्प्लोर

अटल बिहारी वाजपेयींना जडलेला डिमेन्शिया नेमका काय?

सभा, मैफिली आपल्या अमोघ वक्तृत्वाने गाजवणारा अटल बिहारी वाजपेयींसारखा नेता अचानक एकाकी पडला तो डिमेन्शियामुळे

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत मालवली. ते 93 वर्षांचे होते. किडनी संसर्गामुळं वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाजपेयींनी तीन वेळा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं. जिंदादिल राजकारणी, हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्ववादी म्हणून अटल बिहारी वाजपेयी परिचीत होते. हिंदुत्ववादी भूमिकेकडे झुकले असूनही वाजपेयींनी नेहमीच धर्मनिरपेक्षतेची बाजू घेतली. त्यामुळेच त्यांना ‘राईट मॅन इन राँग पार्टी’ असं म्हटलं गेलं. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मूत्रसंसर्ग म्हणजे यूरिन इन्फेक्शन झाल्यामुळे तज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत होती. मात्र त्यांना डिमेन्शिया म्हणजे स्मृतीभ्रंश झाला होता. सभा, मैफिली आपल्या अमोघ वक्तृत्वाने गाजवणारा हा नेता अचानक एकाकी पडला. या अफाट व्यक्तिमत्वाला एका आजाराने जखडलं आणि तब्बल एक दशक त्यांना बेडवर पडून काढावं लागलं. वाजपेयी 2009 पासूनच अंथरुणाला खिळले आहेत. डिमेन्शिया म्हणजे काय? डिमेन्शिया हा ठराविक आजार नाही, तर मनोवस्था आहे. स्मृतीभ्रंशाशी निगडीत अनेक लक्षणांना एकत्रितपणे डिमेन्शिया असं संबोधलं जातं. स्मृती, भाषा, एकाग्रता, तर्कशुद्धता, दृष्यमानता यापैकी कोणत्याही दोन मानसिक कार्यांमध्ये असंतुलन असल्यास 'डिमेन्शिया' झाल्याचं म्हणू शकतो. अल्झायमर हा मेंदूशी निगडीत आजार जडल्यास डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढते. डिमेन्शियाच्या 60 ते 80 टक्के केसमध्ये अल्झायमर हे कारण असतं. त्याशिवाय स्ट्रोक, डिप्रेशन, औषधांचे साईड इफेक्ट, मद्यपान ही डिमेन्शियाची कारणं ठरु शकतात. थायरॉईड किंवा जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारा डिमेन्शिया बरा होऊ शकतो. वयोमानानुसार माणसाची स्मरणशक्ती कमी होत जाते. मात्र अल्झायमरमुळे मेंदूची कार्यक्षमता झपाट्याने कमी होते आणि रुग्णाचा शॉर्ट टर्म मेमरी लॉस होण्याची शक्यता असते. अशा रुग्णाला सतत निगराणीखाली ठेवण्याची आवश्यकता असते. तुम्ही आपल्या परिचितांची नावं, दैनंदिन कार्य विसरता, नेहमीच्या जागाही तुमच्या लक्षात राहत नाहीत. काही केसेसमध्ये माणसं घरी जाण्याचा पत्ता विसरतात. असं दिशाहीन भटकत असतानाच डिमेन्शिया पेशंटचे अपघाती मृत्यू अधिक झालेले आहेत. दिल्लीतल्या मनोहर लाल शर्मा यांची केस अशीच भयानक आहे. पाच दिवस घराबाहेर भटकल्यानंतर डिहायड्रेशनमुळेच त्यांचा मृत्यू झाला. कारण, पाणी प्यायची आठवणही त्यांना राहिली नव्हती. त्यामुळे आजार साधा दिसत असला तरी कधीकधी तो इतकं भयानक रुप घेतो. सरकारी पातळीवर डिमेन्शियाकडे दुर्लक्ष सरकारी पातळीवर अजूनही या आजाराला फारसं गांभीर्याने घेतलं जात नाही. डिमेन्शिया पीडित रुग्णांसाठी देशात जे सात डे केअर सेंटर आहेत, त्यांना 2015-16 या एकूण वर्षभरात सरकारकडून मिळालेला निधी होता केवळ 66 लाख रुपयांचा. आजाराचं निदान न झाल्यामुळे अनेकदा व्यक्तीवर उपचारही होत नाहीत

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Embed widget