एक्स्प्लोर

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी गृह विलगीकरणातील औषधे आणि काय काळजी घ्यावी? तज्ज्ञांचं मार्गदर्शन

60 वर्षांवरील रुग्ण, उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन), मधुमेह, ह्रदयाचे विकार, किडनी, फुप्फुसाचे विकार असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गृह विलगीकरणा निर्णय घ्यावा, असे डॉ नीरज यांनी सांगितले.  

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सेंटर ऑफ एक्सलन्सडकडून कोविड पॉझिटीव्ह रुग्णांसाठी “गृह विलगीकरणातील औषधे आणि घ्यावयाची काळजी” या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. एम्स दिल्ली येथील डॉ मनीष, डॉ नीरज निश्चल यांनी या वेबिनारमध्ये तज्ञ म्हणून मार्गदर्शन केले. डॉ. मनीष यांनी 'सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी उपचारासंदर्भातील सुधारित मार्गदर्शक सूचना' तर 'गृह विलगिकरणातील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी औषधांचे व्यवस्थापन' यासंदर्भात डॉ. नीरज यांनी मार्गदर्शन केले.

ताप, खोकला, थकवा, वास किंवा चव जाणे ही कोविड पॉझिटीव्ह रुग्णांची सर्वसामान्य लक्षणे आहेत. तर, घसा खवखवणे (दुखणे), डोकेदुखी, अंगदुखी, अतिसार (जुलाब), त्वचेवर पुरळ येणे, डोळे लाल होणे ही साधारणतः रुग्णांमध्ये कमी प्रमाणात  दिसून येणारी लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसून येताच रुग्णांनी तातडीने अलगीकरण करुन घ्यावे, असे डॉ नीरज निश्चल यांनी सांगितले. कोविड रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण अति सौम्य लक्षणं असलेली असतात. कोविड चाचणी केल्यानंतर जर चाचणी निगेटीव्ह आली असेल आणि तरीही लक्षणे दिसून येत असतील तर पुन्हा चाचणी करावी. पॉझिटीव्ह रुग्णांना त्यांच्या आजाराच्या तीव्रतेनुसार रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घ्यावा, असे डॉ नीरज निश्चल म्हणाले.

कोविड काळात कोणती औषधं घ्यायची याबद्दल माहिती असते पण त्या औषधांचा योग्य वेळी योग्य वापर महत्वपूर्ण आहे, योग्य औषध योग्य वेळी घेतल्यास रुग्णांना खरा लाभ होतो, असे डॉ. नीरज यांनी यावेळी स्पष्ट केले. 60 वर्षांवरील रुग्ण, उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन), मधुमेह, ह्रदयाचे विकार, किडनी, फुप्फुसाचे विकार असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गृह विलगीकरणा निर्णय घ्यावा, असे डॉ नीरज यांनी सांगितले.  

कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनी नियोजनाचा भाग म्हणून काही तयारी करणे देखील आवश्यक आहे. नियमित लागणारी औषधे, निर्जंतुकिकरणासाठीच्या वस्तू, वैद्यकीय दर्जाचे मास्क, इत्यादी आणून ठेवणे, घरात रोज लागणाऱ्या सामानासाठी नियोजन करणे, आरोग्य विषयक माहितीसाठी डॉक्टर,आरोग्य कर्मचारी, हॉट लाईन नंबरची यादी करणे तसेच ऐन वेळेला लागणाऱ्या मदतीसाठी  कुटुंबातील सदस्य, मित्रपरिवार, शेजारी यांचे संपर्कही तयार ठेवणे, लहान मुले असल्यास त्यांची काळजी घेण्यासाठी योग्य व्यवस्था करणे आदी गोष्टींचा यात समावेश आहे, असे डॉ. नीरज निश्चल यांनी नमूद केले.

सौम्य आणि अतिसौम्य लक्षणे असलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांनी गृह विलगीकरण करुन घ्यावे. अशा रुग्णांनी कुटुंबातील सदस्यांपासून विशेषतः बालकांपासून अंतर ठेवून राहिले पाहिजे. नियमित लागणारी औषधे जवळ बाळगावी. उपचार सुरु असलेल्या किंवा संपर्कात असलेल्या डॉक्टरांसोबत नियमित संवाद ठेवावा. गृह विलगीकरणात असलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांनी नियमितपणे तीन पदरी मास्क वापरावा. 8 तासानंतर मास्कची योग्य विल्हेवाट लावावी. रुग्णाशी संबंधित काम करताना  रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती  आणि  रुग्ण यांनी दोघांनी ही  N-95 मास्क वापरावा.

पल्स ऑक्सिमीटरचा वापर अतिशय व्यवस्थितरित्या करावा. नेल पॉलिश आणि कृत्रिम नखे असतील तर ती काढावी आणि हात जर थंड असेल तर थोडा उबदार करुन घ्यावा. नियमित चाचणी करण्यापूर्वी पाच मिनिटे विश्रांती घ्यावी. पाच सेकंद जर नोंद बदलली नाही तर ती नोंद तुमची त्यावेळची ऑक्सिजन पातळी दाखवत असते. रेमडेसिवीरचा वापर घरी करु नये. रुग्णांनी सकारात्मक राहावे, नियमित व्यायाम करावा, असे डॉ नीरज निश्चल म्हणाले.

कोविड व्यवस्थापनाचा सध्या आपल्याकडे केवळ एक वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे उपचाराविषयी कोणत्याही निष्कर्षाला येणे उचित नाही, असे डॉ मनीष यांनी सांगितले. ऑक्सिजन पातळी 94 पेक्षा कमी असल्यास रुग्णालयात दाखल व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला. ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी रुग्णाचे वय, जुनाट व्याधी या लक्षात घेणे आवश्यक आहे.

आयव्हरमेक्टीन (Ivermectin) देण्याविषयीचा  निर्णय हा रुग्णांची प्रतिकारशक्ती, इतर बाबी यावर अवलंबून आहे. तीच बाब पॅरासिटेमोल बाबतही आहे. त्यामुळे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच  कुठलीही औषधे घ्यावी, असे डॉ मनीष यांनी सांगितले. फॅबीफ्लूबाबत माहिती देताना ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारच्या नियमावलीत फॅबीफ्लू घेण्याविषयी सांगण्यात आले आहे. ग्लेनमार्कने 150 रुग्णांचा अभ्यास केला, त्यानुसार फॅबीफ्लूची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, यातून आयव्हरमेक्टीन वगळण्यात आले आहे.

अनेकदा रुग्णांकडून अझिथ्रोमायसीनची मागणी केली जाते, मात्र नियमावलीत स्पष्टपणे सांगिले आहे की, या गोळ्या वापरु नका. अशीच सूचना रेवीडॉक्स (Revidox) बाबतही आहे. गृह विलगीकरणात अझिथ्रोमायसीन आणि रेवीडॉक्स (Revidox)  या औषधाचा वापर करु नये.  चर्चे दरम्यान  दोन्ही तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, गृह विलगीकरणात कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dyanradha Fraud Update: ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी,  मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी, मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
Narhari Zirwal : गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mega Block At Central Railway : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक अजून सुरुच, प्रवाशांचे हालABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 January 2024Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कारGadchiroli C60 Commando : नक्षल्यांचा खात्मा करणारी 'सी-60' आहे तरी कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dyanradha Fraud Update: ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी,  मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी, मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
Narhari Zirwal : गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
Walmik Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
बीड जिल्हा रुग्णालयात वाल्मिक अण्णांचा राजेशाही थाट, चकाचक वॉर्डमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट
Astrology : यंदाचा प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Chhaava :
"तो सीन डिलीट करा", छावा चित्रपटाच्या वादावरुन उदयनराजेंचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना फोन
Maharashtra Kesari 2025: पुण्याच्या भाग्यश्री फंडने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं, मानाच्या चांदीच्या गदेवर नाव कोरलं
पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं
Embed widget