एक्स्प्लोर

Andhra skill development scam : 118 कोटींची लाच, 350 कोटींचा भ्रष्टाचार, चंद्रबाबू नायडूंवर नेमके आरोप काय ?

Andhra skill development scam : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीआयडीने आज अटक केली.

Andhra skill development scam : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीआयडीने आज अटक केली. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आंध्र प्रदेशच्या सीआयडीने तेलगू देसम पार्टीचे प्रमुख नायडू यांना अटक केली. नंदयाल (nandyal) येथे ते बसमध्ये होते. बसमधून उतरताच त्यांना एसआयटी आणि सीआयडीने अटक केली. कौशल विकास घोटाळ्यामध्ये त्यांनी कोट्यवधी रुपयांची लाच घेतल्याचा त्यांचावर आरोप आहे. 

कोणत्या कलमांअंतर्गत (The Indian Penal Code) अटक - 

चंद्रबाबू नायडू यांना अटक  केल्यानंतर सीआयडीचे अटक वॉरंट समोर आलेय. त्यानुसार, त्यांच्यावर भादवि 120B (criminal conspiracy), 420 (cheating and dishonestly inducing delivery of property) आणि 465 (forgery) कलम लावण्यात आलेय. सीआरपीसी कलम 50(1)(2) अंतर्गत चंद्रबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे आरोप ?

आंध्र प्रदेशमधील वायएसआर काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी चंद्रबाबू नायडू यांना भ्रष्टाचारप्रकरणी दोन दिवसात अटक होईल, असा दावा केला होता. सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रबाबू नायडू यांच्यावर 118 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला. त्याशिवाय त्यांच्यावर 350 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचाही आरोप आहे. दरम्यान, कौशल विकास घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू यांना आरोपी एक नाव देण्यात आलेय. चंद्रबाबू नायडू यांच्यावर या प्रकरणात 250 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. 2021 मध्ये याप्रकरणी पहिल्यांदा गुन्हा नोंदवला गेला होता. त्यावेळी 25 जणांना आरोपी घोषित केले होते. विशेष म्हणजे नायडू यांचे नाव एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नव्हते.

काय आहे कौशल विकास घोटाळा ?

चंद्रबाबू नायडू यांच्या सरकारमध्ये युवांना रोजगार देण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट योजना आणली होती.  कौशल विकास प्रशिक्षण अंतर्गत तरुणांना नोकरीसाठी तयार करण्याची योजना होती. सरकारने योजनाअंतर्गंत ही जबाबदारी Siemens या कंपनीला दिला होती. सहा क्लस्टर्स तयार करण्यात आले होते, याचा एकूण खर्च 3300 कोटी रुपये तका होती. प्रत्येक क्लस्टरवर 560 कोटींचा खर्च होता. 

राज्य सरकारमधील एकूण 10 टक्के म्हणजेच, 370 कोटी रुपये खर्च करणार होते. इतर 90 टक्के खर्च कौशल विकास प्रशिक्षण देणारी कंपनी Siemens  करणार होती. चंद्रबाबू नायडू सरकारने त्यांच्या वाट्याचे 371 कोटी रुपये शेल कंपनीला ट्रान्सफर केले. त्याशिवाय त्यासंदर्भातील कागदपत्रेही संपवल्याचा आरोप आहे. 

अटक केल्यानंतर चंद्रबाबू नायडू काय म्हणाले ?

सीआयडीने अटक केल्यानंतर चंद्रबाबू नायडू यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कौशल विकास घोटाळ्यासंदर्भातील  पुराव्याशिवाय न्यायालयात केस सुरु आहे. न्यायालयात प्रकरण सुरु असताना अटक कशी कऱण्यात आली, असे नायडू म्हणाले.  चंद्रबाबू नायडू यांच्या वकिलांनी कागदपत्रे आणि एफआयआर कॉपी मागितली असता पोलिसांनी देण्यास नकार दिला. रिमांड रिपोर्ट दाखवू शकत नाही, असे पोलिसांनी सांगितले.

चंद्रबाबू नायडूंशिवाय यांनाही अटक 

चंद्रबाबू नायडू यांच्याशिवाय टीडीपीच्या इतर नेत्यांनाही अटक केली आहे.ब्रह्मानंद रेड्डी, भूमा अखिलप्रिया, जगत विख्यात रेड्डी, एवी सुब्बार रेड्डी, बीसी जनार्दन रेड्डी आणि स्थानिक नेत्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, चंद्रबाबू नायडूंचा मुलगा नारा लोकेश याला गोदावरी जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 

आणखी वाचा :

Chandrababu Naidu Arrest: आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना पहाटेच तडकाफडकी अटक, मुलालाही घेतलंय ताब्यात, नेमकं प्रकरण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटरनिटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटरनिटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uruli Kanchan Palkhi : उरूळी कांचन इथे तुकोबांच्या पालखीचा नगारा अडवलाVishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदमABP Majha Headlines : 2 PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPratap Sarnaik on Acharya Marathe College :चेंबुर कॉलेजच्या जीन्स , टी शर्ट बंदीचा मुद्दा विधानसभेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटरनिटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटरनिटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Embed widget