एक्स्प्लोर

Today In History : मुंबईजवळ 'रामदास' बोट बुडाली, 625 जणांचा मृत्यू; इतिहासात आज

What Happened on July 17th : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते.

What Happened on July 17th This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 17 जुलै रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या.  दरवर्षी आंतरराष्ट्रीय न्याय दिन 17 जुलै रोजी साजरा करण्यात येतो.  इमोजीचं महत्त्व दाखवण्यासाठी 17 जुलै रोजी 'वर्ल्ड इमोजी डे' (World Emoji Day 2022) साजरा केला जातो. मुंबईजवळ समुद्रात 'रामदास' बोट बुडाली, यामध्ये 625 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

महिलांना सार्वजनिक सेवा परीक्षा देण्याचा अधिकार
भारताच्या इतिहासात 17 जुलै हा दिवस महिलांसाठी खास आणि महत्वाचा आहे, कारण याच दिवशी देशभरातील महिलांना सार्वजनिक सेवा परीक्षा देण्याचा अधिकार मिळाला. 1848 मध्ये महिलांना प्रशासकीय सेवा आणि पोलिस सेवेसह सार्वजनिक सेवांसाठीच्या परीक्षांमध्ये सहभागी होण्याची पात्रता मिळाली. यापूर्वी या सेवांवर फक्त पुरुषांचाच अधिकार होता.

World Day for International Justice (आंतरराष्ट्रीय न्याय दिन)

दरवर्षी आंतरराष्ट्रीय न्याय दिन 17 जुलै रोजी साजरा करण्यात येतो. यामागचे कारण असे की, 2010 रोजी कंपाला (युगांडा) मध्ये झालेल्या रूम विधान कायद्याचा आढावा परिषदेत राज्य पक्षांच्या असेंब्लीने 17 जुलै हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाचा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय न्यायाची मजबुतीकरण यंत्रणा ओळखण्यासाठी तसेच पीडितांच्या हक्कांना सहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायासाठी अंतरराष्ट्रीय न्याय जागतिक दिन दर वर्षी 17 जुलैला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिन हा रोम विधानचा ऐतिहासिक वापर आणि 1998 मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाची नवीन यंत्रणा स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

जागतिक इमोजी दिवस World Emoji Day 

इमोजी हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनलाय. इमोजीचं महत्त्व दाखवण्यासाठी 17 जुलै रोजी 'वर्ल्ड इमोजी डे' (World Emoji Day 2022) साजरा केला जातो. इमोजीपीडियाचे (Emojipedia) संस्थापक जेरेमी बर्गे (Jeremy Burge) यांनी 2014 मध्ये 'इमोजी डे' साजरा करण्यास सुरुवात केली होती. संवाद साधताना इमोजी आपल्याला भाषेची बंधन तोडण्यात मदत करतात. कारण इमोजीमुळे तुमच्या भावना योग्यप्रकारे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. इमोजीचा शोध जपानमध्ये लागल्याचं सांगितलं जातं. इमोजी पहिल्यांदा जपानमध्ये 90 च्या दशकात वापरले जायचे. त्यानंतर हळूहळू ते जगभरात पसरले. 2010 नंतर,इमोजींचा वापर वाढू लागला आणि आता हे इमोजी वेबसाइट्स आणि अॅप्समध्ये वापरले जातात.

'रामदास' बोट मुंबईजवळ समुद्रात बुडाली, 625 जणांचा मृत्यू

भाऊच्या धक्क्यावरून रेवसला निघालेली 'रामदास' ही बोट समुद्रात बुडाली. यामध्ये 625 जणांचा मृत्यू झाला. 17 जुलै 1947 रोजी ही दुर्देवी घटना घडली. 'रामदास' बोट 17 जुलै रोजी मुंबई बंदरापासून अवघ्या नऊ मैलांवर असलेल्या 'काशा'च्या खडकाजवळ सोसाट्याच्या वाऱ्यामुळे व दोन प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे कलटी झाली. बोट समुद्रात बुडाली आणि तिच्याबरोबर त्या बोटीने प्रवास करणारे 625 उतारूही समुद्रात बुडून मरण पावले. जवळपास 250 जणांना वाचवण्यात यश आले होते.

17 जुलै रोजी घडलेल्या इतर महत्वाच्या घटना-

1489 : निजाम खानला सिकंदर शाह लोदी II या नावाने दिल्लीचा सुलतान म्हणून घोषित करण्यात आले.
1549 : यूरोपीय देश बेल्जियममधील घेंट परिसरातून ज्यू लोकांना काढले
1712 : इंग्लंड, पुर्तगाल आणि फ्रान्सने युद्वविराम संधीवर सह्या केल्या.
1850 : हार्वर्ड वेधशाळेने ताऱ्याचे पहिले छायाचित्र घेतले.
1893 : इंग्लंडचा आर्थर श्रेव्सबरी यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. असा पराक्रम करणारा तो पहिला क्रिकटर ठरला
1919 : फिनलँडमध्ये संविधानाला मान्यता देण्यात आली.
1917 : भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक बिजोन भट्टाचार्य यांचा जन्म.
1929 : सोव्हिएत युनियनने चीनशी राजनैतिक संबंध संपवले.
1943 : ब्रिटेनच्या रॉयल एअर फोर्सने (आरएएफ) जर्मनीच्या पीनमुंदे रॉकेट बेसवर हल्ला केला
1947: भारताचे प्रवासी जहाज रामदास मुंबईजवळ वादळात अडकले, 625 लोक मरण पावले.
1948 : भारतातील महिलांना भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलिस सेवेसह सर्व सार्वजनिक सेवांमध्ये सामील होण्याची परवानगी मिळाली.
1950 : पंजाबमधील पठाणकोट शहराजवळ भारतातील पहिले प्रवासी विमान कोसळले.
1975 : अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.
1987 : ईराण आणि फ्रान्स यांच्यामधील राजकीय संबंध तुटले
1994 : विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले.
1995 : फोर्ब्सने मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून जाहीर केले.
2000 : अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना भरतनाट्य शिखरमणी पुरस्कार जाहीर.
2000: बिहारची राजधानी पाटणा येथील लोकनायक जयप्रकाश विमानतळावर पोहोचत असताना अलायन्स एअरचे विमान कोसळले. यामध्ये 60 जणांचा मृत्यू झाला. 
2006 : डिस्कवरी हे अंतराळयान13 दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर केप कॅनबेरा (फ्लोरिडा) येथील अंतराळ केंद्रात यशस्वीरित्या उतरले.
2008 : अफगाणिस्तानमधून नाटोच्या लष्कराने पाकिस्तानमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांवर मिसाइल आणि हेलिकॉप्टरने हल्ला केला. 
2014: यूक्रेन आणि रशिया सीमाजवळ मलेशिया एअरलाइन्सचे बोइंग 777 विमान दुर्घटनाग्रस्त झाले, विमानात असणाऱ्या 298 प्रवाशांचा मृत्यू झाला.
2015: इराकमधील दियालामध्ये बॉम्बस्फोट झाला..  या हल्ल्यात 120 जणांचा मृत्यू झाला तर 130 जण जखमी झाले.  
2018 : अभिनेत्री रिटा भादुरी यांचे निधन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indias Got Latent Controversy: समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
Temperature Today: कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
Andheri Murder : पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 15 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सPM  Modi America Tour :मोदी ट्रम्प यांची गळाभेट, अमेरिका भेटीतून काय साधलं?Kumbh mela चं कारण, मतभेदाचं तोरण; फडणवीसांच्या बैठकांना शिंदेंची दांडी यात्रा Special ReportDhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांनी आरोप केलेली बी टीम कोणती? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indias Got Latent Controversy: समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
Temperature Today: कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
Andheri Murder : पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.