एक्स्प्लोर

Today In History : आज राष्ट्रीय सुशासन दिवस, चार्ली चाप्लिन यांचं निधन ; इतिहासात आज

On This Day In History : आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात. आज म्हणजे 25 डिसेंबर रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. 

What Happened on December 25th This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 25 डिसेंबर रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या आहेत. यात महत्वाचं म्हणजे  आज जगभरात ख्रिसमस अर्थात नाताळचा सण साजरा केला जातो. त्याशिवाय आजच दिवस भारतामध्ये राष्ट्रीय सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो. तर आजच्या दिवशी चार्ली चाप्लिन यांचं निधन झालं होतं. 25 डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशात अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्तींचं ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते. अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो. पाहूयात आजच्या दिवशी इतिहासात काय काय घडलेय. 

आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

ख्रिसमस (Christmas Day)

आज 25 डिसेंबर अर्थात ख्रिसमस. ह्या दिवशी ख्रिस्ती बांधवांचे लाडके प्रभू येशू यांचा जन्म झाला होता. संपूर्ण जगभरात ख्रिसमस हा सण जल्लोषात साजरा केला जातो.  याला नाताळ असेही म्हटले जाते. नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा आहे.   महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेषात येऊन भेटवस्तू देतात. जगभरात ख्रिसमसच्या दिवशी  ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जातात. प्रार्थना करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देत केक खाऊ घालतात. या दिवशी केक कापण्याची परंपरा आहे.  नाताळ हा शब्द नातूस म्हणजे जन्म या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. या दिवसाला इंग्रजी भाषेत ख्रिसमस म्हणतात. ख्रिसमस म्हणजे ख्रिस्तमहायज्ञ (मिस्सा). ख्रिस्त महागुरुंना ख्रिस्तमसच्या दिवशी तीन मिस्सा अर्पण करण्याची परवानगी दिली गेली. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला अशी मान्यता आहे.

ख्रिसमसमध्ये ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छा पत्रे देऊन परस्पर अभिनंदन करतात. आपल्या घरात रोषणाई करतात. घराला सजवतात. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ करतात.  हे झाड ह्या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या ईडन बागेतील झाड व क्रूसाचे झाड यांचे प्रतीक असल्याची मान्यता आहे.

राष्ट्रीय सुशासन दिवस ( Good Governance Day)

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिवशी (Atal Bihari Vajpayee Birth Anniversary) प्रत्येक वर्षी भारतात 'गुड गव्हर्नन्स डे' अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो. अटल बिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी भारताचं नाव अनेक क्षेत्रात मोठं केलं. 2014 सालीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी 'गुड गवर्नेंस डे' साजरा करण्याची घोषणा केली होती.

अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म -

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 साली मध्यप्रदेशत्या ग्वाल्हेरमध्ये झाला होता. ते तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. 1996 साली पहिल्यांदा तर 1998-99 मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. तर 13 ऑक्टोबर 1999 ला तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले. अटल बिहारी वाजपेयी हे संयुक्त राष्ट्र संघामध्ये हिंदीत भाषण देणारे पहिले नेते होते. त्यांचं हिंदीवर खूप प्रेम होतं. 27 मार्च 2015 ला त्यांना 'भारत रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चार्ली चाप्लिन यांचं निधन -

आजच्याच दिवशी 1977 मध्ये जगप्रसिद्ध अभिनेता चार्ली चाप्लिन यांचं निधन झालं होतं. चार्ली चॅपलिन यांचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी लंडनमध्ये झाला होता. त्यांचं पूर्ण नाव चार्ल स्पेन्सर चॅपलिन होतं. चार्ली चॅपलिन यांनी लहान वयातच नाटक आणि विनोदी कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. अवघ्या 19 व्या वर्षी एका अमेरिकन कंपनीने त्यांच्याशी करार केला आणि ते अमेरिकेला रवाना झाले. चार्ली चॅपलिन यांनी अमेरिकेत सिनेकारकीर्दीची सुरुवात केली. 1918 सालापर्यंत ते जगातील ओळखीचा आणि लोकप्रिय चेहरा बनले होते. चार्ली यांनी 'अ वुमन ऑफ पॅरिस', 'द गोल्ड रश', 'द सर्कस', 'सिटी लाईट्स', 'मॉर्डन टाइम्स' यांसारख्या प्रसिद्ध आणि यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं.

25 डिसेंबर 1977 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी चार्ली चॅपलिन यांचं निधन झालं. परंतु मृत्यूच्या दोन महिन्यानंतर काही लोकांनी त्यांचा मृतदेह चोरला होता. त्याचं कॉफिनचं चोरल्याचं चौकशीतून समोर आलं होतं. चार्ली यांच्या कुटुंबियांकडून खंडणी मागण्याच्या उद्देशाने मृतदेहाची चोरी करण्यात आली होती. चोरांनी 6 लाख स्विस फ्रँक्सची मागणी केली होती. परंतु त्यांच्या पत्नीने ही रक्कम देण्यास इन्कार केला होता. मात्र नंतर त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. यानंतर चोरीपासून वाचवण्यासाठी त्यांचा मृतदेह 6 फूट कॉंक्रिटच्या खाली दफन करण्यात आला.

माजी राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंह यांचं निधन -

आजच्याच दिवशी 1994 मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंह यांचं निधन झालं होतं. ज्ञानी झैल सिंह भारताचे सातवे राष्ट्रपती होते. 25 जुलै 1982 ते 25 जुलै 1987 या काळात ज्ञानी झैल सिंह भारताचे राष्ट्रपती होते. 

अभिनेत्री साधना यांचं निधन -

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साधना शिवदासानी (Sadhana Shivdasani) यांचं आजच्याच दिवशी 2015 मध्ये निधन झालं. त्या 60च्या दशकात सर्वात सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या. 1960 मध्ये रिलीज झालेल्या 'लव्ह इन शिमला' या चित्रपटातून त्यांनी डेब्यू केला होता. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्याशिवाय त्यांचा हेअरकट प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या केसाच्या कटाला साधना कट असेच म्हटले जाते. 

मदन मोहन मालवीय यांचा जन्म -

आजच्याच दिवशी 25 डिसेंबर 1861 रोजी स्वातंत्र्यसैनिक तसेच शिक्षणतज्ज्ञ मदन मोहन मालवीय यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली होती. मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलेय. 

नवाज शरीफ यांचा जन्म -

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती नवाज शरीफ यांचा आज जन्मदिवस आहे. 25 डिसेंबर 1949 रोजी नवाज शरीफ यांचा जन्म झाला होता. पनामा पेपर्स प्रकरणाशी संबंधित नवाज शरीफ यांना राष्ट्रपतीपद सोडावं लागलं. पंतप्रधानपदावर असताना नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. 

वर्ल्ड वाइड वेबची चाचणी -

आजच्याच दिवशी 1990 मध्ये वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी झाली. अत्यंत साध्या पद्धतीचे हे वेब पेज पहिल्या दिवशी ज्याप्रमाणे होते त्याचप्रकारे आजही आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget