West Bengal Opinion Poll 2021 : ममता बनर्जी, दिलीप घोष, मुकुल रॉय आणि अधीर रंजन मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती? काय म्हणतोय सर्वे?
West Bengal Opinion Poll 2021 : पश्चिम बंगालच्या 294 विधानसभेच्या जागांसाठी 27 मार्चपासून 29 एप्रिल दरम्यान, आठ टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच ABP न्यूजसाठी सी वोटरने सर्वे केला आहे.
West Bengal ABP Opinion Poll : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून तीन दिवसांनी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापूर्वी ABP न्यूजसाठी सी वोटरने सर्वे केला आहे. ABP Opinion Poll मध्ये अनेक प्रश्नांमार्फत लोकांचा कल कोणाकडे आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
Opinion Poll मध्ये प्रश्न विचारण्यात आला की, मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला पसंती आहे? 55 टक्के लोकांनी ममता बॅनर्जी यांचं नाव घेतलं. तर 32 टक्के लोकांनी दिलीप घोष यांचं नाव घेतलं आहे. तर केवळ 1 टक्के लोकांनी अधीर अंजन यांचं आणि 6 टक्के लोकांनी मुकुल रॉय यांचं नाव घेतलं आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला पसंती?
ममता बॅनर्जी : 55%
दिलीप घोष : 32%
मुकुल रॉय : 6%
अधीर रंजन : 1%
पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी टीएमसीची स्पर्धा भाजप आणि काँग्रेस-लेफ्ट-आयएसएफ गठबंधनाशी असणार आहे. टीएमसी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढत आहे. तसेच भाजप आणि काँग्रेस-लेफ्ट-आयएसएफ गठबंधनने मुख्यमंत्री पदासाठीच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही.
पश्चिम बंगालच्या 294 विधानसभेच्या जागांसाठी 27 मार्चपासून 29 एप्रिल दरम्यान, आठ टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकांचा निकाल दोन मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
टीप : abp न्यूजसाठी सी वोटरने निवडणुका असणाऱ्या 5 राज्यांमध्ये सर्वे केला आहे. या सर्वेमध्ये 47 हजार 334 लोकांची मतं जाणून घेतली. यामध्ये सर्वाधिक पश्चिम बंगालच्या 17 हजार 890 लोकांचा समावेश आहे. त्याचसोबत 17 ते 22 मार्च दरम्यान पश्चिम बंगालमध्ये स्नॅप पोलही घेण्यात आला. ज्यामध्ये 2 हजार 290 लोकांची मतं जाणून घेण्यात आली. या पोलमध्ये मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 % आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :