Weather Today : सहा राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, पर्वतीय भागात बर्फवृष्टी; आज देशातील हवामान कसं असेल? जाणून घ्या
Weather Forecast Today : देशातील 6 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर, डोंगराळ भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Weather Update Today : देशातील डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी (Snowfall) सुरु आहे. यामुळे मैदानी भागात कडाक्याची थंडी (Cold Weathers) पडली आहे. आज देशातील 6 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा (Unseasonal Rain) इशारा (IMD Alert) देण्यात आला आहे. आज आणि उद्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत तामिळनाडू, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेश आणि दक्षिण राजस्थानमध्ये गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडेल. 27 नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाचं हवामान बिघडलं
आज पहाटेपासून तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे चेन्नईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर तामिळनाडूमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे मुंबई आणि दिल्लीत हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक राज्यात पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पर्वतीय भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पर्वतीय भागातील बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडी हळूहळू वाढणर आहे. तर, डिसेंबरची सुरुवात कडाक्याच्या थंडीने होऊ शकते.
'या' भागात पावसाची शक्यता
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय राजस्थानमधील 6 जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून त्यात चित्तोडगड, सिरोही, उदयपूर, बारमेर, जालोर आणि पाली या जिल्ह्यांचा समावेश आहे. स्कायमेट हवामानानुसार, 25 नोव्हेंबरपासून वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होणार आहे, त्यानंतर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागात बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तामिळनाडू आणि केरळ अवकाळी पावसाची धुमाकूळ
गुरुवारपासून तामिळनाडू (Tamilnadu) आणि केरळ (Kerala) मधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) झाला आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. तमिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये दरड कोसळल्यानं वाहतूकही विस्कळीत झाली आहे. अनेक भागात पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.
तामिळनाडू आणि केरळ राज्यात मुसळधार पावसाचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आदेशापर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे शुक्रवारी निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर-मेट्टुपालयम राष्ट्रीय महामार्ग आणि कोठागिरी-मेटुपलायम महामार्गावर सुमारे 10 ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती.