(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...तर वासनिक, चव्हाण, देवरांना राज्यात फिरु देणार नाही; काँग्रेसचेच मंत्री सुनील केदार यांचा धमकीवजा इशारा
काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आज सकाळी 11 वाजता होणार आहे. सोनिया गांधी राजीनामा देणार असल्याच्या चर्चा आहे. त्यातच पक्षातल्या 23 ज्येष्ठ नेत्यांनीच पक्षाच्या अवस्थेबद्दल सोनिया गांधींना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी माफी मागावी, असं सुनील केदार यांनी म्हटलंय.
नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन सुरु असलेल्या पेचाचे पडसाद महाराष्ट्रात उघडपणे संघर्षात उमटताना दिसत आहेत. मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा या तिघांनी माफी मागावी, अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते त्यांना राज्यात मोकळेपणाने फिरु देणार नाहीत, असा इशारा काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे.
ज्या 23 नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं त्यात महाराष्ट्रातल्या मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण मिलिंद देवरा या तिघांचा समावेश होता. काँग्रेसला पूर्णवेळ सक्रिय अध्यक्ष हवा ही प्रमुख मागणी करत या 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. पण काल संध्याकाळपासूनच काँग्रेसमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ एक मोहीम सुरु झाली आहे. त्यामुळे हे पत्र लिहिणारे तेवीस नेते पक्षात एकटे पडत आहेत असं चित्र निर्माण झाला आहे. त्यात महाराष्ट्रातल्या कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्याच पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना अशा पद्धतीने उघड इशारा दिल्याने त्याची चर्चा होत आहे.
I wholeheartedly support Hon. Sonia Gandhi ji as president. Its shameful on Mukul Wasnik, Prithviraj Chavhan and Milind Deora to raise questions on leadership of Gandhi family. These leaders must apologies for their act immediately. Otherwise Congress workers will see how they
— Sunil Chattrapal Kedar (@SunilKedar1111) August 23, 2020
Move in state freely. Congress can give fight to BJP govt only when party has gandhi as it's head. This is high time to stand firmly behind Sonia ji's leadership.@SoniaGandhi_FC @RahulGandhi @priyankagandhi
— Sunil Chattrapal Kedar (@SunilKedar1111) August 23, 2020
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी वर्किंग कमिटीच्या बैठकीत आज अध्यक्षपदाचा राजीनामा देणार?
हे तीन नेते आज पत्र लिहून सांगत आहेत, पण त्यांनी पक्ष वाढीसाठी काय केले असा प्रश्न सुनील केदार यांनी एबीपी माझाशी बोलताना उपस्थित केला. शिवाय 2014 च्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे पक्षाचं वाटोळं झालं, असा आरोप देखील केला. त्यामुळे अध्यक्षपदावरुन आता काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचल्याचे दिसतं आहे.
पृथ्वीराज चव्हाण, मुकूल वासनिक मिलिंद देवरा या तीनही नेत्यांना संघटना आणि सरकार असताना महत्त्वाची पदे मिळाली होती. पण सोनिया गांधी ते राहुल गांधी असं पक्षात स्थित्यंतर होत असताना ते काहीसे बाजूला पडल्याचे चित्र निर्माण झालं.