एक्स्प्लोर
प्रलंबित खटल्यांसाठी आणखी 70 हजार न्यायाधीशांची गरज : सरन्यायाधीश

नवी दिल्ली : देशातील न्यायाधीशांच्या अपुऱ्या संख्येचा मुद्दा सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. देशातील विविध प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी आणखी 70 हजार न्यायाधीशांची गरज आहे, असं मत टी. एस. ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे.
न्यायाधीशांच्या अपुऱ्या संख्येमुळेच प्रकरणं प्रलंबित राहतात, त्यामुळे न्यायाधीशांची संख्या वाढवण्याची गरज त्यांनी पुन्हा बोलून दाखवली आहे. कटक येथील उच्च न्यायालयाच्या सर्किट पीठाच्या शताब्दी महोत्सवात ठाकूर बोलत होते.
आणि मोदींसमोरच सरन्यायाधीशांना अश्रू अनावर झाले...
टी एस ठाकूर हे यापूर्वीही न्यायाधीशांच्या कमतरतेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर भावूक झाले होते. न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी पंतप्रधानांना विनंती न्याय हा जनतेचा महत्त्वाचा अधिकार आहे. सरकार सुद्धा या तथ्याला नकारु शकत नाही, असे ठाकूर यांनी सांगितलं. न्यायाधीशांच्या नियुक्तीचे जवळपास 170 प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहेत. हा मुद्दा नुकताच पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिला होता. त्यासोबतच न्यायाधीशांची नियुक्ती लवकरात लवकर व्हावी, यासाठी पंतप्रधानांना विनंती केली होती, असे ठाकूर यांनी सांगितलं.आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण























