एक्स्प्लोर
उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यातील 69 जागांसाठी मतदान
![उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यातील 69 जागांसाठी मतदान Voting For Uttar Pradesh Third Phase Election उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यातील 69 जागांसाठी मतदान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/19100249/voting-line7-580x395.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील 69 जागांसाठी आज मतदान होत आहे. 12 जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या या मतदानामध्ये समाजवादी पार्टीसमोर आपला किल्ला वाचवण्याचं मोठं आव्हान असेल. कारण यापैकी अनेक मतदार संघ ‘सपा’चा बालेकिल्ला मानले जातात.
तिसऱ्या टप्प्यातील 69 जागांपैकी ‘सपा’ला गेल्या निवडणुकीत 55, ‘बसपा’ला 6, भाजपला 5 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आला होता.
दरम्यान आपण बहुमताने निवडून येऊ, असा विश्वास बसपा अध्यक्ष मायावतींनी बोलून दाखवला आहे. आपले 300 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील, असं त्या मतदान केल्यानंतर म्हणाल्या.
तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही भाजपचं सरकार बहुमताने येईल, असा विश्वास बोलून दाखवला. मतदान करण्यासाठी गेले असता ते बोलत होते.
उत्तर प्रदेशमध्ये यापूर्वी दोन टप्प्यांमध्ये मतदान झालं असून एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर 11 मार्चला मतमोजणी होणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 63 टक्के मतदान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)