एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींच्या सैन्यदलावरील 'त्या' वक्तव्याचे व्हायरल सत्य

नवी दिल्ली: सध्या सोशल मीडियावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक ट्वीट कमालीचं व्हायरल होत आहे. या ट्वीटमधून मोदींनी सैन्यदलासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हायरल होणाऱ्या या ट्वीटमध्ये, आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे आपल्या भारतीय सैन्य दलाच्या कमजोरीमुळे होतं का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियावरुन व्हायरल होणाऱ्या या ट्वीटवरुन राजकारणही चांगलंच तापलं आहे. पंतप्रधानांचे हे ट्वीट तीन वर्षापूर्वी 2013 सालातील असल्याचे सांगण्यात येत असून त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए सरकार सत्तेत होतं. त्यामुळे या ट्वीटचा आधार घेऊन तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी चीन आणि पाकिस्तानकडून निर्माण केल्या जाणाऱ्या समस्यांबाबत सैन्यदलाला दोषी धरल्याचा दावा करण्यात येत आहे. या ट्वीटचाच आधार घेऊन आम आदमी पक्षानेही राजकारण तापवलं असून, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं आहे. हे ट्वीट संजय सिंह यांनी पोस्ट करुन पंतप्रधानांचे सैन्य दलाबाबत आजही हेच मत आहे का? असा प्रश्न विचारला आहे. तसेच त्यांनी पंतप्रधानांना तत्कालिन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी या प्रतिक्रीयेशी सहमत आहेत का? असा टोलाही लगावला आहे. sanjay-singh-tweet व्हायरल होणाऱ्या या ट्वीटची एबीपी न्यूजने पडताळणी केली. यावेळी पंतप्रधानांनी तीन वर्षापूर्वी हरियाणातील रेवाजमध्ये झालेल्या सभेतील तो भाषणाचा भाग असल्याचे समोर आले. या सभेच्या दोनच दिवस आधी नरेंद्र मोदींना भाजपने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. 13 सप्टेंबर 2013 रोजी मोदींची पंतप्रधान पदासाठी घोषणा झाल्यानंतर 15 सप्टेंबर रोजी माजी सैनिकांच्या सभेत माजी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना 'वन रँक वन पेंशन' चं आश्वासन दिलं होतं. त्यावेळच्या भाषणात मोदींनी शेजारील राष्ट्रांकडून ज्या काही समस्या निर्माण केल्या जात आहेत, त्याला सैन्य दल जबाबदार नाही, तर केंद्रातील यूपीए सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी कधीही सैन्यदलावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाहीत. पण संजय सिंहनी यावरुन राजकारण करताना मोदींचे ते भाषण नीट पाहिलं नसल्याचं दिसून येतं. कारण त्या भाषणातच संजय सिंह यांच्या प्रश्नाचे उत्तर होतं. पण सिंह यांनी या ट्वीटला अशा पद्धतीने ट्वीट केलं, जसे की मोदींनी सैन्य दलावरच प्रश्न उपस्थित केले होते. 222222222222 त्यामुळे एबीपी न्यूजच्या या पडताळणीत व्हायरल होणारे हे ट्वीट चुकीचं असल्याचं समोर आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget