एक्स्प्लोर
Advertisement
सिनेमागृहातील सीटवर HIV संक्रमित इंजेक्शनच्या सुईचे व्हायरल सत्य
नवी दिल्ली : सोशल मीडियावर रोज नवनवे फोटो, व्हिडीओ, मेसेज व्हायरल होत असातात. या व्हायरल फोटो, मेसेज आणि व्हिडीओच्या माध्यमातून अनेक थक्क करणारे दावे केले जातात. सोशल मीडियावर असाच एक मेसेज व्हायरल होत असून, यात सिनेमागृहातील सीटवर एचआयव्ही संक्रमित सुई तुम्हाला एचआयव्हीबाधित रुग्ण बनवू शकते, असा दावा केला आहे.
सोशल मीडियातील व्हायरल मेसेजचा दावा पटवून देण्यासाठी दिल्लीतल्या एका घटनेचा दाखला दिला जात आहे. या घटनेनुसार, काही दिवसांपूर्वीच दिल्लीतल्या प्रिया सिनेमागृहात सिनेमा पाहत असताना, तिला तिच्या सीटमधून काहीतरी टोचत असल्याचं जाणवलं. यानंतर तिने उठून पाहिलं, तर तिला एका इंजेक्शनची सुई टोचत होती. आणि त्यासोबत एक पत्रही तिला मिळालं. या पत्रात या सुईमुळे तुम्ही एचआयव्ही बाधित रुग्ण झाला आहात, असा उल्लेख केला होता.
विशेष म्हणजे, या मेसेजमधून एका आयएस अधिकाऱ्याने नागरिकांना सूचित केल्याचं सांगितलं आहे. कारण ही सूचना आयएस दर्जाचे अधिकारी असलेल्या चेन्नईच्या मेडिकल आणि रिसर्च विभागाचे संचालक अरविंद खामिटकर यांनी केल्याचे या मेसेजमधून सांगण्यात येत होतं.
त्यामुळे या व्हायरल मेसेजची सत्यता पडताळण्यासाठी एबीपी न्यूजच्या टीमने दिल्लीच्या वसंत विहार परिसरातील प्रिया सिनेमागृहाशी संपर्क साधाल. यावेळी सिनेमागृहाचे मॅनेजरांकडून याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. पण मेसेजमधील दावे फेटाळून लावत, अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं सांगितलं. दुसरीकडे दक्षिण दिल्लीतल्या पोलीस निरिक्षकांकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांनीही अशी कोणतीही घटना समोर आली नसल्याचं यावेळी सांगितलं.
पण मेसेजमध्ये आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याचं नाव असल्यानं, त्या अधिकाऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी चेन्नईतील डायरेक्टर ऑफ मेडिकल अॅण्ड रिसर्च विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण असा कोणताही विभाग चेन्नई कार्यरत नसून, अरविंद खामिटकर नावाची व्यक्तीही शासकीय सेवेत नसल्याचं एबीपी न्यूजच्या तपासणीतून समोर आलं.
यानंतर मेसेजमधील दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी एबीपी न्यूजच्या टीमने डॉ. एमजीआर वैद्यकीय विद्यापीठाच्या प्रयोग विभागाच्या डॉ. एस.मिनी जॅकब यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी जॅकब यांनी सांगितलं की, ''हा मेसेज पूर्णपणे चुकीचा आहे. ही केवळ आफवाह असून, याकडे लक्ष देण्याची गरज नाही. कारण एचआयव्हीचा विषाणू अतिशय कमजोर असून, तो बाह्य वातावरणात जगू शकत नाही. जगात कुणालाही अशाप्रकारे एचआयव्हीची बाधा झाल्याची घटना समोर आली नाही.'' विशेष म्हणजे, हाच मेसेज या आधी वेगवेगळ्या नावानं व्हायरल झाल्याचं डॉ. जॅकब यांनी यावेळी सांगितलं.
त्यामुळे एबीपी न्यूजच्या पडताळणीत व्हायरल मेसेजमधील दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
भारत
Advertisement