![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
विशालला कुसुमचा मेसेज मिळाला, आता विशाल कुसुमला पळवून नेणार का? दहाची नोट पुन्हा व्हायरल
Viral Note : कुसुमने पाठवलेला मेसेज विशालला मिळाला असून त्यावर विशालचे उत्तरही आलं आहे.
![विशालला कुसुमचा मेसेज मिळाला, आता विशाल कुसुमला पळवून नेणार का? दहाची नोट पुन्हा व्हायरल Viral 10 rupee Note Vishal got Kusum s message will Mission Kusum be successful now विशालला कुसुमचा मेसेज मिळाला, आता विशाल कुसुमला पळवून नेणार का? दहाची नोट पुन्हा व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/25/f8fdd93fada52484cc24586c6334db9c_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: काही दिवसांपूर्वी एक दहाची नोट व्हायरल होत होती, कुसुम नावाच्या प्रेयसीने विशालला आर्त हाक देत आपल्याला पळवून नेण्याचं आवाहन केलं होतं. आता त्या संदेशाला विशालने उत्तर दिलं असून मी तुला न्यायला येतोय असं लिहिलेली नोट व्हायरल होत आहे. आता हा विशाल खरंच कुसुमचा प्रियकर आहे की कोणी छपरी, टवाळकी मुलाने हे उगाच व्हायरल केलंय हे मंगळवारी, 26 एप्रिलला स्पष्ट होणार आहे.
कुसुमचे 26 एप्रिलला लग्न आहे. ते लग्न तिच्या मनाविरोधात होत असल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळेच तिने एका दहाच्या नोटेवर "विशाल, माझं लग्न 26 एप्रिलला आहे. त्या आधी मला पळवून ने. आय लव्ह यू, तुझीच कुसूम." असा संदेश लिहिला होता आणि तो संदेश विशालपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आता याच नोटेला उत्तर देणारी दुसरी नोट व्हायरल होत असून त्यावर विशालने उत्तर लिहिलंय. विशालने या नोटेवर लिहिलं आहे की, "कुसुम मला तुझा संदेश मिळाला आहे. मी तुला न्यायला येईन. आय लव्ह यू. तुझाच विशाल'.
आता हा विशाल खरंच कुसुमपर्यंत पोहोचणार का? तो कुसुमला पळवून नेणार का? की कुसुमचे नातलग त्याला धू-धू धुणार? विशालचे 'मिशन कुसुम' यशस्वी होणार का? की फेल जाणार? या सर्व गोष्टींची उत्तरं आजच म्हणजे मंगळवारी मिळणार आहेत. कारण आजच कुसुमचं लग्न आहे.
Ek pyar Aisa bhi.
— AJAY YADAV (@AJAYYAD46374764) April 23, 2022
Mil gya kusum ka jvab.
ViShal 26April aayega#LOVEDIVE pic.twitter.com/MGVV0QJX4B
ही नोट आता कुसुमच्या नातेवाईकांपर्यंतही पोहोचली असेल हे नक्की. त्यामुळे कुसुमचे नातेवाईक विशालची वाटच पाहत असणार, कधी एकदा तो हाताला लागतोय आणि कधी एकदा त्याला फटके देतोय अशीच भावना त्यांची असेल.
महत्त्वाचं म्हणजे कुसुमच्या विशालला घातलेल्या आर्त सादाची आणि विशालने त्याला दिलेल्या उत्तराची, या दोन्ही नोटा सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत.
या नोटेवरील माहितीवरुन स्पष्ट समजतं की, कुसुम नावाच्या एका मुलीचं 26 एप्रिल रोजी लग्न ठरलं असून ते लग्न तिच्या मनाविरुद्ध होतंय. त्यामुळे तिने या नोटेच्या माध्यमातून तिच्या प्रियकराला साद घातलीय. त्यामध्ये 26 तारखेच्या आधी आपल्याला पळवून ने असं सांगितलं आहे.
सोनम गुप्ता बेवफा है...
या आधी काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारची दहा रुपयांची नोट व्हायरल झाली होती. त्यावर 'सोनम गुप्ता बेवफा है' असं लिहिलं होतं. त्यावरुन अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत होते.
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)