एक्स्प्लोर
प्रवीण तोगडियांच्या गाडीला ट्रकची मागून धडक
“ट्रकने गाडीला मागून धडक दिली. जर माझी गाडी बुलेटप्रूफ नसती, तर मी आज जिवंत नसतो. हा माझ्या हत्येचा कट होता”, असं तोगडिया म्हणाले.
गांधीनगर: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या गाडीला एका ट्रकने धडक दिली. या अपघातातून तोगडिया बचावले आहेत. मात्र आपल्या हत्येचा हा कट होता, असा आरोप त्यांनी केला आहे. सुरतजवळ हा अपघात झाला.
“ट्रकने गाडीला मागून धडक दिली. जर माझी गाडी बुलेटप्रूफ नसती, तर मी आज जिवंत नसतो. हा माझ्या हत्येचा कट होता”, असं तोगडिया म्हणाले.
मला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे, मात्र पूर्ण सिक्युरिटी अद्याप का दिलेली नाही, असा सवाल तोगडियांनी उपस्थित केला आहे.
मला केवळ एक व्हॅन देण्यात आली आहे. पोलिसांची एस्कॉर्ट व्हॅन आणि रुग्णवाहिका दिलेली नाही, असं तोगडियांनी सांगितलं.
दरम्यान, या अपघातानंतर ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.
प्रवीण तोगडिया जानेवारी महिन्यात अचानक गायब झाले होते. ते 15 जानेवारीला अहमदाबादजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळले होते.
उपचारानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, आपल्या हत्येचा कट सुरु असल्याचं म्हटलं होतं.
मोदी सरकार माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा गंभीर आरोप तोगडियांनी त्यावेळी केला होता.
संबंधित बातम्या
माझा एन्काउंटर करण्याचा कट, प्रवीण तोगडिया ढसाढसा रडले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement