एक्स्प्लोर
माझा एन्काउंटर करण्याचा कट, प्रवीण तोगडिया ढसाढसा रडले
जुन्या खटल्यांचा हवाला देऊन माझा एन्काऊंटर करण्याचा कट, मी घाबरणार नाही, हिंदूंचा आवाज उठवणारच : प्रवीण तोगडिया
अहमदाबाद : अहमदाबादमध्ये बेशुद्धावस्थेत सापडलेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी शुद्धीवर आल्यानंतर पत्रकार परिषद घेतली.
मोदी सरकार माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा गंभीर आरोप तोगडियांनी केला.
अज्ञात घरात घुसला
एक माणूस अचानक माझ्या घरात घुसला. त्याने मला सांगितलं की तुमचा एन्काउंटर होणार आहे. आयबीच्या माध्यमातून मला घाबरवलं जात आहे. इतकं असूनही मी काल पोलिसांना सोडून रिक्षातून निघालो होतो. लोकेशन कळू नये म्हणून मी फोन स्वीच ऑफ केला होता.
जयपूरला विमान पकडण्यासाठी निघालो होतो, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाटेतच बेशुद्ध पडलो, पुढचं काही आठवत नाही, असं तोगडियांनी सांगितलं.
हिंदूंबाबत आवाज उठवणारच
हिंदूंबाबतचा माझा आवाज उठतच राहणार, मी थांबणार नाही. हिंदू आणि शेतकऱ्यांबद्दल मी आवाज उठवणारच, असं प्रवीण तोगडिया म्हणाले.
या पत्रकार परिषदेत प्रवीण तोगडिया हे ढसाढसा रडत होते.
जुने खटले काढून मला त्रास देण्याच प्रयत्न सुरु आहे. या खटल्यांच्या नावे माझा एन्काऊंटर करण्याचा कट रचला जात आहे, असा आरोप तोगडिया यांनी केला.
पोलीस, सीबीआय यासारख्या संस्थांनी सरकारच्या दबावाला बळी पडू नये, असं आवाहन त्यांनी केलं.
तोगडिया म्हणाले, "काही दिवसांपासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र हिंदू एकतेसाठी माझं काम सुरुच राहील. अनेक वर्षांपासून मी राम मंदिर, गोहत्या, काश्मिरी हिंदूंचं विस्थापन, शेतकऱ्यांना दीडपट आधारभूत किंमत यासारख्या मुद्द्याबाबत लढत आहे. त्यामुळेच माझा आवाज दाबला जात आहे"
प्रवीण तोगडिया यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
जुन्या खटल्यांचा हवाला देऊन माझा एन्काऊंटर करण्याचा कट, मी घाबरणार नाही, हिंदूंचा आवाज उठवणारच : प्रवीण तोगडिया
काही दिवसांपासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न
जुन्या केसेस काढून मला अटक करण्याचा डाव
तुम्हाला उचलून चकमक करण्याचा प्रयत्न, असं घरात घुसून एका व्यक्तीने सांगितलं : प्रवीण तोगडिया
मी मृत्यूला घाबरत नाही... नेसल्या कपड्यांसह, पैशांच्या पाकिटासह कार्यालयाबाहेर पडलो : प्रवीण तोगडिया
राजस्थान गृहमंत्र्यांनी पोलिस वॉरंट पाठवल्याचं नाकारलं, माझं लोकेशन सापडू नये, म्हणून फोन स्वीच ऑफ केला आणि बाहेर पडलो : प्रवीण तोगडिया
बेपत्ता तोगडिया बेशुद्ध
प्रवीण तोगडिया सोमवारी (15 जानेवारी) सकाळी दहा वाजल्यापासून बेपत्ता झाले होते. अहमदाबादमध्ये रात्रीच्या सुमारास ते बेशुद्ध अवस्थेत सापडले होते. त्यानंतर त्यांना अहमदाबादमधील शाहीबाग परिसरातील चंद्रमणी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं.
चंद्रमणी रुग्णालयाचे डॉ. अग्रवाल यांच्या माहितीनुसार, "अहमदाबादच्या कोटरपूर भागातील पार्कमध्ये एका व्यक्तीला प्रवीण तोगडिया बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्याने कॉल करुन अॅम्ब्युलन्स बोलावली. तोगडिया यांना रात्री 9 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शरीरातील साखरेचं प्रमाण घटल्याने ते बेशुद्ध झाले होते. तोगडिया यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानतंर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल."
बेपत्ता प्रवीण तोगडिया बेशुद्धावस्थेत, अहमदाबादेत उपचार सुरु
तोगडिया काल सकाळी सुरक्षेशिवाय घराबाहेर पडून रिक्षातून गेले होते. राजस्थान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा विहिंपने ते गायब झाल्यानंतर केला होता. पण राजस्थान पोलिसांनी हे आरोप फेटाळले.
विहिंपची तक्रार
प्रवीण तोगडिया बेपत्ता झाल्यानंतर वीहिंपने अहमदाबाद क्राईम ब्रान्चमध्ये तक्रार दाखल केली होती. तोगडिया संशयित परिस्थितीत बेपत्ता झाले असून त्यांच्या जीवाला धोका आहे, असं विहिंपने तक्रारीत म्हटलं होतं. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवलं. अहमदाबादमधील विहिंपच्या कार्यालयाबाहेर एसआरपीचे सुमारे 30 जवान सुरक्षेसाठी तैनात केले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement