एक्स्प्लोर

I.N.D.I.A : नव्या वर्षात इंडिया आघाडीच्या भात्यात नवीन पक्ष, 'वंचित'चा समावेश पक्का झाल्याची माहिती

VBA Prakash Ambedkar : उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. 

मुंबई: येत्या नवीन वर्षाच्या सुरूवातीला विरोधकांच्या इंडिया आघाडीत (I.N.D.I.A ) आणखी एका नव्या पक्षाचा समावेश होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासंदर्भात इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची मान्यता असल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  पुढाकार घेऊन प्रमुख नेत्यांची चर्चा केल्याची माहिती आहे. 

विरोधकांच्या इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घ्यावे यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच राष्ट्रावदीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे. तसेच या संदर्भात बैठक घेऊन 28 डिसेंबरनंतर त्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर एका संयुक्त बैठकीचं आयोजन केले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

इंडिया आघाडीच्या निर्णयानंतर राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात इंडिया आघाडीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती आहे. 

वंचितला इंडिया आघाडीचा भाग करावा यासाठी आपण स्वतः मल्लिकार्जुन खरगेंशी चर्चा केल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली. त्यामुळे वंचितचे इंडिया आघाडीमध्ये समावेश हा पक्का असल्याची चर्चा आहे. 

वंचित आघाडीची बैठक

तिकडे वंचित आघाडीने 26 डिसेंबरला वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची बैठक बोलावली आहे. प्रकाश आंबेडकरांनी राज्य कमिटीच्या सर्व सदस्यांची तातडीची बैठक बोलावली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 30 जागांवर पक्षाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे. मागील 20 दिवसांत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची ही दुसरी बैठक आहे. मागील बैठक 5 डिसेंबर रोजी मुंबईत झाली होती. यात लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि रोडमॅप विषयी चर्चा झाली होती. 

सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल 

तिकडे सुजात आंबेडकर यांनी नांदेडमधील कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघात झालेल्या निर्धार मेळाव्यात I.N.D.I.A. आघाडीवर तुफान हल्ला चढवला होता. तुम्हाला संधी दिली होती पुन्हा रडत येऊ नका.. पुन्हा रडत आलात तर ठोकून काढू, असं सुजात आंबेडकर म्हणाले. "काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर अजूनही काँग्रेसने अजूनही निर्णय घेतला नाही. त्यावर सुजात आंबेडकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

ही बातमी वाचा: 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramesh Pardeshi: मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
नांदेड हादरलं ! स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्राच्या रूमवर गेली, खोलीतच लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमका प्रकार काय?
नांदेड हादरलं ! स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्राच्या रूमवर गेली, खोलीतच लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमका प्रकार काय?
शिवसेना-भाजपमधील नेमका वाद काय? एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; सरनाईकांनी सांगितला बैठकीचा वृत्तांत
शिवसेना-भाजपमधील नेमका वाद काय? एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; सरनाईकांनी सांगितला बैठकीचा वृत्तांत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pratap Sarnaik PC : शिवसेनेत नेमकी कसली नाराजी? प्रताप सरनाईक यांनी A TO Z सगळं सांगितलं
Chandrakant Khair : शिंदेंचे २२ आमदार त्यांना सोडून जातील, चंद्रकांत खैरेंचा दावा
Uday Samant : आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकला नाही, मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली माहित नाही- सामंत
Vikhroli Building demolition: विक्रोळी पार्कसाईटमध्ये पालिकेची धडक कारवाई
Prakash Mahajan : ज्यांच्यासाठी लढले, विरोधकांना भिडले, त्या Raj Thackeray यांच्यावर घणाघाती टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Pardeshi: मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
नांदेड हादरलं ! स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्राच्या रूमवर गेली, खोलीतच लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमका प्रकार काय?
नांदेड हादरलं ! स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्राच्या रूमवर गेली, खोलीतच लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमका प्रकार काय?
शिवसेना-भाजपमधील नेमका वाद काय? एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; सरनाईकांनी सांगितला बैठकीचा वृत्तांत
शिवसेना-भाजपमधील नेमका वाद काय? एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; सरनाईकांनी सांगितला बैठकीचा वृत्तांत
12 वीत शिकणाऱ्या मुलीच्या घरावर दगडफेक, मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन तरुणींचा राडा
12 वीत शिकणाऱ्या मुलीच्या घरावर दगडफेक, मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन तरुणींचा राडा
Eknath Shinde : ऑपरेशन लोटसमुळे शिंदे नाराज, कोणत्या प्रवेशांमुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी टोकाची भूमिका घेतली?
ऑपरेशन लोटसमुळे शिंदे नाराज, कोणत्या प्रवेशांमुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी टोकाची भूमिका घेतली?
अनगरमध्ये 60 वर्षात पहिल्यांदाच निवडणूक, राजन पाटलांना भिडणाऱ्या उज्ज्वला थिटे कोण; मोहोळच्या वादाची A टू Z स्टोरी
अनगरमध्ये 60 वर्षात पहिल्यांदाच निवडणूक, राजन पाटलांना भिडणाऱ्या उज्ज्वला थिटे कोण; मोहोळच्या वादाची A टू Z स्टोरी
Advay Hiray: अद्वय हिरेंचा भाजप प्रवेश शिंदे गट थांबवणार का? उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या घरी जाऊन बसले, नाशिकच्या राजकारणात ट्विस्ट
अद्वय हिरेंचा भाजप प्रवेश शिंदे गट थांबवणार का? उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या घरी जाऊन बसले, नाशिकच्या राजकारणात ट्विस्ट
Embed widget