एक्स्प्लोर

HIV Infection : धक्कादायक! टॅटू गोंदवल्यानंतर 14 जणांना एचआयव्हीची लागण, उत्तर प्रदेशमध्ये खळबळ

HIV Infection: अनेक जण आजकाल टॅटू गोंदवतात. टॅटू गोंदवण्याची क्रेज आपल्याला वाढताना बघायला मिळत आहे. मात्र, उत्तर प्रदेशात टॅटू गोंदवणे काही जणांना चांगलेच महाग पडले आहे.

HIV Infection: अनेक जण आजकाल टॅटू गोंदवतात. टॅटू गोंदवण्याची क्रेज आपल्याला वाढताना बघायला मिळत आहे. मात्र, उत्तर प्रदेशात टॅटू गोंदवणे काही जणांना चांगलेच महाग पडले आहे. इतकं की थेट ते मृत्यूच्या दाढेत ढकलले गेले आहेत. काय आहे हा संपूर्ण प्रकार पाहूयात.  अनेक लोक टॅटू गोंदवून घेण्याआधी अनेक गोष्टींचा विचार करतात. तो कोणत्या डिझाइनचा असावा, कसा असावा, कोणासाठी असावा? दुसरीकडे, गोंदवून घेताना तो सुरक्षित आहे की नाही? दुखणार तर नाही? असे एका ना असंख्य प्रश्न टॅटूगोंदवणाऱ्याच्या मनात असतात. पण, टॅटू काढणाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे काही जणांचे आयुष्य उद्धवस्त होण्याची वेळ आली आहे. टॅटू काढण्यासाठी एकाच सुईचा वापर केल्यानं उत्तर प्रदेशातील वाराणसीत काही जणांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. 

उत्तर प्रदेशात 14 जणांना टॅटू गोंदवल्यानंतर अचानक ताप आला. त्यानंतर त्यांची टायफाइड आणि मलेरियासंदर्भातली तपासणी करण्यात आली. मात्र, यात काहीच निष्पन्न झालं नाही. ताप कमी होत नसल्यानं एचआयव्हीची चाचणी करण्यात आली. आणि त्यातून सर्वांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचं समोर आलं.  ह्या चौदाही जणांची विचारपूस करण्यात आल्यानंतर त्यांनी अलीकडेच शरीरावर टॅटू काढल्याचे सांगितलं. तेव्हा कळलं की टॅटू काढण्याची सुई ही महाग असते आणि अशातच टॅटू काढणाऱ्याने पैसे वाचवण्यासाठी एकाच सुईचा वापर केल्याने ह्या सर्वांचा जीव टांगणीला लागलाय.  

सुईचा वापर करण्यात आल्यानं एचआयव्हीची लागण झाल्याने आयुष्यातील पुढील धोके देखील ह्या लोकांचे वाढले आहेत. अशात, पुढे जात ह्या सर्वांना एड्सचा देखील धोका आहे. त्यामुळे घडलेला हा सर्व प्रकार धक्कादायक असल्याचे सांगितले जाते आहे.  एक सुई जीव वाचवू शकते तर तीच सुई जीव घेऊ देखील शकते. अशात टॅटू बनवणाऱ्यांनी देखील फक्त अधिकचे पैसे मिळवण्यासाठी असे प्रकार न करता यासंदर्भात अधिकची काळजी घेतली तर असे धोके टळतील. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
Share Market : भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन,अर्थसंकल्पाकडून आशा 
अर्थसंकल्पाकडून आशा,भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन 
Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
Walmik Karad Wife Property: लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines at 11AM 29 January 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्सMahakumbh Mela Stampede :घटनास्थळी कचराच कचरा..,चेंगराचेंगरीनंतरची दृश्यABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines at 9AM 29 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सMahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
Share Market : भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन,अर्थसंकल्पाकडून आशा 
अर्थसंकल्पाकडून आशा,भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन 
Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
Walmik Karad Wife Property: लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी विद्यार्थ्यांना दिला यशस्वी होण्याचा मंत्र, प्रगतीसाठी एआयचा नव्हे बुद्धीचा वापर करण्याचा सल्ला
मुकेश अंबानींचा विद्यार्थ्यांना सल्ला,प्रगतीसाठी एआयचा नव्हे तुमच्या बुद्धीचा वापर करा...
BJP Is The Richest Political Party In India : भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
KRK On Saif Kareena: बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
Embed widget