(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vaccine for children : लहान मुलांना कोरोना लस; 'या' लशीचे एक कोटी डोस खरेदीचे सरकारचे आदेश
ZyCoV-D Vaccine: केंद्र सरकारने तीन डोस असलेल्या 'जाइकोव्ह-डी' लशीचे एक कोटी डोस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. 12 वर्षावरील व्यक्तींसाठी ही लस असणार आहे.
vaccine for children : कोरोना महासाथीच्या आजाराशी संपूर्ण देश दोन हात करत असताना आता लहान मुलांनाही कोरोना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने अहमदाबाद येथील कंपनी जाइडस कॅडिलाने विकसित केलेल्या 'जाइकोव्ह-डी' या लशीचे एक कोटी डोस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय करोना विषाणू विरोधी लसीकरण मोहिमेत लशीचा समावेश या महिन्यातच करण्यात येणार आहे. या लशीचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विकसनशील देशातील पहिल्या डीएनए-आधारीत कोविड-19 लशीचा लसीकरण मोहिमेत समावेश करण्यासाठी सुरुवातीच्या प्राथमिक पावलांना मंजुरी दिली आहे.
भारतातील औषध नियामक प्राधिकरणाने 12 वर्ष व त्यावरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी 'जाइकोव्ह-डी' लशीला मंजुरी दिली आहे. वय वर्ष 12 व त्यावरील व्यक्तीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आलेली ही पहिलीच लस आहे. केंद्र सरकारने 'जाइकोव्ह-डी' लशीचे एक कोटी डोस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. एका डोसची किंमत कराशिवाय 358 रुपये आहे.
या किंमतीत 93 रुपयाच्या 'जेट एप्लीकेटर'च्या खर्चाचा समावेश आहे. त्याच्या मदतीने लशीचा डोस देण्यात येणार आहे. सूत्रांनी सांगितले की, सध्याच्या मर्यादित उत्पादन क्षमतेमुळे ही लस सुरुवातीच्या टप्प्यात फक्त वयस्करांना देण्याची शक्यता आहे. 'जाइकोव्ह-डी' लशीचे एक कोटी डोस दरमहा उपलब्ध होतील अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सरकारला दिली.
या लशीचे डोस 28 दिवसांच्या अंतराने द्यावे लागणार आहेत. 'जाइकोव्ह-डी' लशीला नियामक प्राधिकरणाकडून आपात्कालीन वापरासाठी 20 ऑगस्ट रोजी मंजुरी देण्यात आली होती.
अजूनही काही लशींवर काम सुरू
CSIR चे संचालक डॉ. शेखर मांडे (DR Shekhar Mande) यांनी म्हटलं की, अजून काही लसींवर जोरात काम सुरू आहे. एमक्युअर नावाची कंपनी आहे. त्यांचेही पहिल्या फेज मधले रिझल्ट चांगले आहेत. लसीचं आपल्या देशात खूप चांगलं काम सुरु आहे. कोवॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी ही आनंदाचीच गोष्ट आहे. हाफ डेड व्हायरस वापरून लस वर्षानुवर्ष तयार केली जाते. जगात आपण ही टेक्निक पहिल्यांदा कोरोना काळात दाखवून दिली, असं ते म्हणाले.