एक्स्प्लोर
एका लग्नपत्रिकेवरुन उत्तराखंडातील राजकारण तापलं
हारिद्वारच्या ज्वालापूराचे भाजप आमदार सुरेश राठोड यांनी आपल्या दत्तक कन्येच्या लग्नपत्रिकेत चक्क उत्तराखंड सरकारचा लोगो वापरला आहे.
देहरादून : केवळ एका लग्नपत्रिकेमुळे उत्तराखंडातील राजकारण चांगलंच तापलं आहे. कारण, हारिद्वारच्या ज्वालापूराचे भाजप आमदार सुरेश राठोड यांनी आपली दत्तक कन्येच्या लग्नपत्रिकेत चक्क उत्तराखंड सरकारचा लोगो वापरला आहे. त्यामुळे यावरुन विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
विशेष म्हणजे, यावरुन स्पष्टीकरण देताना सुरेश राठोड यांनी हा आपला हक्क असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, "एक वेळाही लोकप्रतिनिधी (आमदार) म्हणून निवडणल्यानंतर त्यांना सरकारी लोगो वापरण्याचा नैतिक आधिकार मिळतो."
पण भाजप आमदाराच्या या कृतीवरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसने सुरेश राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, सुरेश राठोड हे राज्यातील दिग्गज दलित नेते असून, ते पहिल्यांदाच विधानसभेवर निवडणून गेले आहेत. तसेच राठोड यांची यापूर्वी उत्तराखंडाच्या एस/एसटी आयोगाच्या अध्यक्षपदी देखील नियुक्ती करण्यात आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement