Uttarakhand Glacier Collapse: उत्तराखंडमधील आपत्तीमुळे ऋषभ पंत दु:खी; मदतीसाठी पुढे सरसावला
ऋषभ पंतने लोकांनाही मदत करण्याचं आवाहन केलं आहे. या कठीण काळात प्रत्येकाने मदतीसाठी पुढे आले पाहिजे. मी आपणा सर्वांना बचाव कार्यासाठी अधिकाधिक मदत करण्याचं ऋषभ पंतने आवाहन केलं.
जोशीमठ : उत्तराखंडच्या चामोली येथे रविवारी हिमनग कोसळल्याची घटना समोर आली. हिमकडा कोसळल्याने चामोलीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा कठीण परिस्थितीत भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. ऋषभ पंतने चेन्नई कसोटी सामन्याची फी उत्तराखंडमधील या नैसर्गिक आपत्तीच्या बचाव कार्यासाठी देणार असल्याचं सांगितलं आहे.
ऋषभ पंतने ट्वीट करुन हिमनग कोसळल्याच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ऋषभ पंतने लिहिले की, “हिमकडा कोसळल्याच्या घटनेमुळे मी दु;खी आहे. तेथील मदतकार्यासाठी माझे सामना शुल्क देण्याचा निर्णय मी घेतला आहे. यावेळी ऋषभ पंतने लोकांनाही मदत करण्याचं आवाहन केलं आहे. या कठीण काळात प्रत्येकाने मदतीसाठी पुढे आले पाहिजे. मी आपणा सर्वांना बचाव कार्यासाठी अधिकाधिक मदत करण्याचं ऋषभ पंतने आवाहन केलं.
ऋषभ पंत हा उत्तराखंडचा रहिवासी आहे. त्याचा जन्म उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यात झाला. ऋषभने आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी टीम इंडियामध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
चेन्नई कसोटीत केली महत्त्वाची खेळी
ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर ऋषभ पंतने चेन्नई कसोटीत आपला शानदार फॉर्म कायम ठेवला आहे. टीम इंडियाने चेन्नई कसोटीत 73 धावा देऊन चार विकेट गमावल्या होता. त्यावेली मैदानात आलेल्या ऋषभ पंतने 91 धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला. मात्र, पंतला भारतात पहिलं शतक ठोकण्यासाठी थोडं आणखी थांबावं लागणार आहे.
संबंधित बातम्या
- Uttarakhand Glacier Burst | 'बोलो बद्री विशाल की जय, ITBP की जय', आपत्तीग्रस्तांना वाचवणारे देवदूत पाहिले?
- Uttarakhand | 'देवभूमी'त याआधीही कोपलेला निसर्ग; पाहा केव्हा घडलेल्या त्या घटना
- Uttarakhand Glacier Collapse: उत्तराखंड सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक जाहीर, घटनेशी संबंधित 10 मोठ्या गोष्टी
- Uttarakhand Glacier Collapse Video | 'भागोsss', हिमकडा कोसळला आणि होत्याचं नव्हतं झालं