एक्स्प्लोर
यूपीत योगींचा गड हादरण्यामागचं नेमकं कारण काय?
भाजपला उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीत धक्का बसला आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जाणाऱ्या गोरखपूर मतदारसंघात समाजवादी पक्षाने जोरदार मुसंडी मारत भाजपच्या उमेदवाराचा धुव्वा उडवला. तर उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचे वर्चस्व असलेल्या फूलपूर मतदारसंघातही भाजपच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला.
नवी दिल्ली : तब्बल 30 वर्षांनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड गोरखपूरमध्ये भाजपचा पराभव झाला. योगी आदित्यनाथ सलग पाच वेळा गोरखपूरचे खासदार राहिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या योगींचाच गड भाजपच्या हातून कसा गेला, हा मोठा प्रश्न आहे.
योगींचा गड हादरण्यामागचं पहिलं कारण
समाजवादी पक्षाने निषाद समाजाचे प्रवीण निषाद यांना उमेदवारी दिली. गोरखपूरमध्ये निषाद समाजाचे सर्वाधिक म्हणजे साडे तीन लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. यादव आणि दलितांची संख्या दोन लाख आहे. तर गोरखपूरमध्ये दीड लाख ब्राम्हण मतदार आहेत. त्यामुळे प्रवीण निषाद यांना मुस्लीम, दलित आणि यादव समाजाची मतं मिळाल्यानंतर मोठा उलटफेर होऊ शकतो, असा अंदाज अगोदरच लावला जात होता.
योगींचा गड हादरण्यामागचं दुसरं कारण
गोरखपूरच्या शहरी भागात कमी प्रमाणात मतदान झालं. गोरखपूरमध्ये एकूण 47.45 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याचाच अर्थ गोरखपूरचे शहरी मतदार योगी आदित्यनाथ यांच्या उमेदावाराला मतदान करण्यासाठी घराच्या बाहेरच पडले नाही.
योगींचा गड हादरण्यामागचं तिसरं कारण
सपा आणि बसपाची युती हे गोरखपूरमधील भाजपच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण आहे. मायावती यांनी अखिलेश यादव यांना समर्थन देत बसपाचा उमेदवार दिला नाही.
योगींचा गड हादरण्यामागचं चौथं कारण
योगी आदित्यनाथ सलग पाच वेळा गोरखपूरचे खासदार राहिले आहेत. त्यांच्यापूर्वी महंत अवैद्यनाथ हे देखील याच मतदारसंघातून खासदार होते. दोघेही गोरक्षनाथ पीठाशी संबंधित आहेत. या पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच गोरक्षपीठाच्या बाहेरच्या व्यक्तीला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं. परिणामी हिंदू मतदारांचं मतपरिवर्तन झालं आणि मतं सपाला गेली.
गोरखपूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास
योगी आदित्यनाथ यांच्यापूर्वी गोरक्षनाथ पीठाचे महंत अवैद्यनाथ 1970 साली अपक्ष खासदार म्हणून लोकसभेवर गेले. 1989 साली अवैद्यनाथ हिंदू महासभेचे खासदार म्हणून निवडून आले. यानंतर 1991 आणि 1996 साली त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. 1998 सालापासून ते 2014 पर्यंत सलग पाच वेळा योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधून विजय मिळवला.
संबंधित बातम्या :
‘अतिआत्मविश्वास नडला’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर योगींची प्रतिक्रिया
यूपीत भाजपला धक्का, पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement