CAA-NRC | 'भारत माता की जय' बोलतील, तेच भारतात राहतील; केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांचं वक्तव्य
देशाला धर्मशाळा बनवायचं आहे का? असा प्रश्न धर्मेंद्र प्रधान यांनी विचारला आहे. ते भारतीय विद्यार्थी परिषदतेच्या एका कार्यक्रमात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीबद्दल बोलत होते.
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीवरुन देशभरातील वातावरण तापलं आहे. देशातील विविध भागात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन) विरोधात आंदोलनं होतं आहेत. या दरम्यान केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. देशाला धर्मशाळा बनवायचं आहे का? भारत माता की जय बोलतील, त्यांनाच भारतात राहता येईल, असं आपल्याला निश्चित करावं लागेल, असं वक्तव धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतेच्या एका कार्यक्रमात धर्मेद्र प्रधान नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीबद्दल बोलत होते. धर्मेंद्र प्रधान यांनी याठिकाणी भाषण करताना तेथील उपस्थितांना विचारणा केली, की तुम्हाला भारताची धर्मशाळा बनवयाची आहे का? ज्याठिकाणी कुणीही कधीही यावं आणि कुणीही राहावं. शहीद भगत सिंह, सुभाषचंद्र बोस यांच्या सारख्या महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. या सर्वांना आठवून आपल्याला एक निर्णय घेतला पाहिजे की, भारतात केवळ तेच लोक राहू शकतात जे 'भारत माता की जय' बोलण्यास तयार आहेत.
#WATCH Union Min D Pradhan:Kya Bhagat Singh aur Neta ji Subhas Chandra Bose ka balidan bekar jaega?Kya logon ne swatantra ke liye isliye ladai ki taaki azadi ke 70 saal baad desh is pe vichaar karega ki nagarikta ginen ya na ginen?Kya is desh ko hum dharmshala banaenge?..(28.12) pic.twitter.com/yNmWHol4bJ
— ANI (@ANI) December 29, 2019
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीवरुन देशभरात अनेक ठिकाणी आंदोलने झाली, काही ठिकाणी अजुनही आंदोलने सुरु आहेत. काही आंदोलनांमध्ये हिंसाचारही झाला. 15 डिसेंबरला दिल्लीतील जामिया विद्यापीठातील हिंसाचारातनंतर देशभरात अनेक हिंसक आंदोलने झाली. उत्तर प्रदेश, बंगळुरु येथे हिंसाचारात काही जणांचा मृत्यूही झाला.
संबंधित बातम्या
- CAA Protest : यूपीमध्ये हिंसक आंदोलनं सुरुच, 16 जणांचा मृत्यू, 263 पोलीस जखमी
- नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणून गोंधळ निर्माण करायची आवश्यकता होती का? राज ठाकरेंचा सवाल
- नागरिकत्व धोक्यात कसं? राहुल गांधींनी सिद्ध करावं; अमित शाहांचं चॅलेन्ज
- CAA हा काळा कायदा, मुसलमानांना देशातून हाकलण्याचा कट; असदुद्दीन ओवेसींचा आरोप