Rabi Crops MSP : केंद्राकडून गव्हासोबत सहा रब्बी पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ
गव्हावरील किमान आधारभूत किंमतीमध्ये 40 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर 1,975 रुपये प्रतिक्विंटलपासून भात आता प्रतिक्विंटल 2,015 रुपये झाला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. आज झालेल्या बैठकीत गव्हाबरोबरच सहा रब्बी पिकांच्या एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने गव्हाचे आधारभूत किंमतीत 40 रूपये वाढवले असून प्रति क्विंटल 2015 रूपये दराने खरेदी केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने बार्ली 35 रुपये, हरभरा 130 रूपये, मसूर 400 रूपये, मोहरी 400 रुपये आणि सॅफफ्लॉवरच्या आधारभूत किंमतीत 114 रूपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की आता बार्ली 1635 रुपये, हरभरा 5230 रुपये, मसूर 5500 रुपये, मोहरी 5050 रुपये आणि सॅफफ्लॉवर 5471 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जाणार आहे.
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी की अध्यक्षता में आज आर्थिक मामलों की मंत्रिमण्डलीय समिति (#CCEA) ने रबी विपणन सत्र 2022-23 के लिए सभी अधिदेशित रबी फसलों के लिए न्यूनतम समर्थन मूल्य (MSP) में वृद्धि को दी मंजूरी...#Cabinet #AatmaNirbharKrishi pic.twitter.com/WZxJsDznlF
— Narendra Singh Tomar (@nstomar) September 8, 2021
गव्हाची एमएसपी 40 रुपयांनी वाढवत 2,015 रुपये प्रति क्विंटल केली आहे. या अगोदर 1,975 रुपये प्रति क्विंटल दर होते. एमएसपी (आधारभूत किंमत) म्हणजे सरकार ज्या किंमतीत शेतकऱ्यांकडून धान्य विकत घेते. सध्या सरकारने खरीप आणि रब्बी हंगामात उगवल्या जाणाऱ्या २३ पिकांच्या आधारभूत किंमती निश्चीत केल्या आहे. खरीप पिकांच्या कापणीनंतर लगेच ऑक्टोंबर महिन्यात रब्बी पिकांची लावणी सुरू होते, गहू आणि सरसो ही प्रमुख रब्बी पिके आहेत.
केंद्रीय मंत्रीमंडळाने वस्त्रोद्योग उद्योगासाठी 10,683 कोटी रूपयांचे अनुदान दिले आहे. शेतकऱ्यांनी नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन तीव्र केले आहे. अलीकडे, शेतकरी संघटनांनी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये महापंचायत आयोजित केली आहे. काही महिन्यांनी उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.