एक्स्प्लोर
काळा पैसा, भ्रष्टाचाराचं समर्थन हे दुर्दैव, मोदींकडून विरोधकांचा समाचार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विरोधकांचा नोटाबंदीच्या मुद्द्यावरुन अप्रत्यक्षपणे समाचार घेतला. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचं आपल्याकडे काही जणांकडून समर्थन होत आहे. मात्र हे दुर्दैवी आहे, असं मोदी म्हणाले.
भाजप नेते केदारनाथ साहनी यांच्या जिवनावर आधारित पुस्तकाचा मोदींच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी बोलताना विरोधाकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
देशात भ्रष्टाचाराचं समर्थन करणारा छोटासा वर्ग आहे. मात्र भ्रष्टाचाराच्या समर्थनार्थ भाषणं करणं, त्याचं समर्थन करणं, हे देशाचं दुर्दैव आहे, असं मत मोदींनी व्यक्त केलं.
नैतिक मूल्यांचं पतन हे देशासाठी घातक असल्याचंही मोदी म्हणाले. भावी पिढीच्या सुरक्षिततेसाठी सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे. भ्रष्टाचाराचं समर्थन करणारे समाजासाठी घातक ठरु शकतात, असंही मोदी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement