UN Warning Next 5 Years To Be Hottest: येणारी 5 वर्ष भयंकर उकाड्याची; संयुक्त राष्ट्राचा इशारा, उष्णता पूर्वीचे रेकॉर्ड्सही मोडणार
UN Warning Next 5 Years To Be Hottest: येत्या पाच वर्षांत लोकांना सर्वाधिक तापमानाचा सामना करावा लागू शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान विभागानं याबाबतचा इशारा दिला आहे.
![UN Warning Next 5 Years To Be Hottest: येणारी 5 वर्ष भयंकर उकाड्याची; संयुक्त राष्ट्राचा इशारा, उष्णता पूर्वीचे रेकॉर्ड्सही मोडणार UN Warning Next 5 Years To Be Hottest world record hottest five years globally united nations warning for weather UN Warning Next 5 Years To Be Hottest: येणारी 5 वर्ष भयंकर उकाड्याची; संयुक्त राष्ट्राचा इशारा, उष्णता पूर्वीचे रेकॉर्ड्सही मोडणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/11/3c0e28241e0fb0dda2de0439143c8a13168377566130076_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
UN Report Hottest Five Years: येत्या पाच वर्षांत जागतिक तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 2023 ते 2027 या काळात कमाल उष्णता कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पाच वर्षांत एक असं वर्षही असेल जे 2016 च्या तापमानाचा विक्रम मोडणारं वर्ष ठरेल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. युनायटेड नेशन्सच्या जागतिक हवामान संघटनेनं म्हटलं आहे की, जागतिक तापमान लवकरच पॅरिस हवामान करारामध्ये निश्चित केलेल्या तापमानाची मर्यादा ओलांडण्याची शक्यता आहे.
खरंतर, 2016 चं वार्षिक तापमान 1.28 डिग्री सेल्सियस होते, जे प्री इंडस्ट्रियल टाईमहून (1850-1900 या कालावधीतील सरासरी) अधिक होतं. 2015 ते 2022 या कालावधीतील आठ सर्वात उष्ण वर्षांची नोंद करण्यात आली आहे. आता हवामान बदलाच्या वेगामुळं तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. WMO च्या म्हणण्यानुसार, पुढील पाच वर्षांमध्ये विक्रमी उष्णता वाढण्याची 98 टक्के शक्यता आहे.
तापमान वाढण्याचं कारण
ग्रीनहाऊस गॅस आणि एल निनोमुळे वाढत्या तापमानाचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. हवामान बदलाच्या वेगामुळं तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये जागतिक तापमान 1850-1900 च्या सरासरीपेक्षा 1.15C वर होते. याशिवाय एप्रिलमधील तीव्र उष्णतेसाठी हवामानातील बदलांना सर्वाधिक जबाबदार धरलं जाऊ शकतं.
तापमान तात्पुरतं वाढेल
याचा अर्थ असा नाही की, जग कायमचं पॅरिस बेंचमार्क ओलांडेल. एजन्सीचे प्रमुख, पीटीरी तालास म्हणाले की, WMO नुसार, आपण तात्पुरत्या आधारावर 1.5C पातळी ओलांडू शकतो. तापमान पातळी नंतर कमी होऊ शकते. येत्या काही महिन्यांत 'अल निनो' विकसित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे उष्णताही वाढणार आहे.
एल-निनोबाबत नासाचाही इशारा
नासाच्या म्हणण्यानुसार, ही मार्च-एप्रिलची गोष्ट आहे, जेव्हा प्रशांत महासागरातील उबदार पाण्याची लाट दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनार्यापासून पूर्वेकडे आली होती. यामुळेच मे महिन्यात आधी थंडी पडली आणि नंतर अचानक उष्णता वाढली. या लाटा एल-निनोच्या आधीच्या लाटा म्हणूनही ओळखल्या जातात. नासानं जारी केलेल्या नकाशात लाल आणि पांढऱ्या रंगाचे समुद्राचे क्षेत्र दिसत आहे, तिथे गरम पाणी वाहत आहे. या गरम पाण्यामुळे देशाच्या विविध भागात भयंकर उष्मा आणि पावसाळा येणार आहे. जोश विलिस यांच्या मते यावेळी एल-निनो आणि सुपरचार्ज केलेले समुद्राचं तापमान एकत्र येत आहे. त्यामुळे पुढील 12 महिने अनेक प्रकारचे रेकॉर्ड मोडले जाऊ शकतात. यातील बहुतांश तापमान कमाल तापमानाशी संबंधित असेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Heat Wave: अचानक उष्णता वाढण्याचं कारण 'एल निनो'; NASAचा रिपोर्ट वाचून तुम्हालाही घाम फुटेल!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)