एक्स्प्लोर
विवाह सोहळ्यातून अपहरण, 22 वर्षीय लेफ्टनंटची दहशवाद्यांकडून हत्या
श्रीनगर: दहशतवाद्यांनी विवाहसोहळ्यातून अपहरण केलेल्या भारताच्या 22 वर्षीय लेफ्टनंटची गोळ्या घालून हत्या केली आहे.
उमर फयाझ असं या शहीद अधिकाऱ्याचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे उमर फयाझ हे 5 महिन्यापूर्वीच आर्मीत भरती झाले होते. लष्कराच्या 'राजस्थान रायफल्स' तुकडीत ते सेवा बजावत होते.
उमर फयाझ यांचा मृतदेह शोपीयन परिसरात आढळला. धक्कादायक म्हणजे त्यांच्या डोक्यात आणि पोटात गोळ्या आढळल्या आहेत.
उमर फयाझ हे मूळचे काश्मीरचेच होते. त्यांनी चुलत भावाच्या लग्नासाठी सुट्टी घेतली होती. दक्षिण काश्मीरमधील कुलगाव इथं हा विवाहसोहळा होता. मात्र रात्री दहाच्या सुमारास दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं.
या अपहरणानंतर त्यांचं कुटुंब दहशतीखाली होतं. भीतीमुळे त्यांनी याबाबतची तक्रारही केली नाही. उमर फयाझ हे परत येतील अशी आशा त्यांना होती. मात्र आज त्यांचा मृतदेहच आढळल्याने खळबळ उडाली आहे.
उमर फयाझ हे राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी अर्थात एनडीए पासआऊट होते. बहुआयामी उमर फयाझ हे एनडीएच्या हॉकी टीममध्ये होतेच, शिवाय ते व्हॉलीबॉलही उत्तम खेळायचे.
डिसेंबरमध्येच ते आर्मीत रुजू झाले होते. त्यांना काश्मीर परिसरातील धोक्याची जाण होती. मात्र कोणत्याही शस्त्राशिवाय त्यांनी गावी जायला नको होतं, असं लष्करी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
उमर फयाझ हे सुट्टीवर असूनही दहशतवाद्यांनी त्यांना टार्गेट केल्याने, लष्करासाठी ही चिंतेची बाब आहे.
नुकतंच पोलिसांनी जम्मू काश्मीरमधील जवानांना दक्षिण काश्मीरमध्ये जाताना सुरक्षितता बाळगावी, असा सल्ला दिला होता. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, शोपीयान, अनंतनाग आणि कुलगाममध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत.
त्यातच स्थानिकांचाही दहशतवाद्यांना पाठिंबा आहे. त्यामुळेच सुरक्षा दलाला दहशतवाद्यांना ठेचण्यास अडथळा निर्माण होत आहे.
दोनच दिवसांपूर्वी हिजबूल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी अझर मेहमूद या पोलिसाची हत्या केली होती. अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करताना मेहमूद यांच्यावर फयाझ अहमद या दहशतवाद्याने हल्ला केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement