India Ukraine Flight : भारत-युक्रेन उड्डाण आणि जागांची संख्या काढून टाकली, एअर बबल करारानुसार MoCA चा निर्णय
India Ukraine Flight : बुधवारी, कीवमधील भारतीय दूतावासाने सांगितले की अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी नजीकच्या भविष्यात आणखी उड्डाणे नियोजित आहेत.
India Ukraine Flight : रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, आता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (Ministry of Corporate Affairs) MoCA एअर बबल व्यवस्थेअंतर्गत भारत-युक्रेन (India Ukraine) दरम्यानच्या फ्लाईट्सची संख्या आणि फ्लाईट दरम्यानच्या जागांच्या संख्येवरील निर्बंध हटवले आहेत. MoCA ने ही माहिती दिली आहे. MoCA नुसार, कितीही उड्डाणे आणि चार्टर उड्डाणे चालू शकतात. वाढत्या मागणीमुळे भारतीय विमान कंपन्यांनी उड्डाणे वाढविण्याची माहिती दिली आहे. MoCA परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधत आहे.
MoCA has removed restriction on number of flights & seats b/w India-Ukraine in Air Bubble arrangement. Any number of flights and Charter flights can operate. Indian airlines informed to mount flights due to increase in demand. MoCA facilitating in coordination with MEA: MoCA pic.twitter.com/kzVEIOLj9p
— ANI (@ANI) February 17, 2022
युक्रेनमध्ये परिस्थिती सुधारत आहे का?
युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्य तैनात केल्यानंतर परिस्थिती सतत बिघडत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अमेरिका आणि रशिया यांच्यात जोरदार भाषणबाजीही सुरू झाली होती. युक्रेनवरून दोन्ही देश एकमेकांशी भिडतील, असे एकेकाळी वाटत होते. पण 15 फेब्रुवारीला रशियाने आपले सैन्य तळावर परत पाठवण्याची घोषणा केल्याचे सांगण्यात आले. युक्रेनवर हल्ला करण्याचा त्यांचा कधीही हेतू नव्हता, या संदर्भात जे काही बोलले जात होते, त्याला कोणताही आधार नव्हता. असेही रशियाकडून सांगण्यात आले आहे. या संदर्भात जे काही बोलले जात होते, त्याला कोणताही आधार नव्हता.
तिसऱ्या महायुद्धाचा होता धोका
रशिया-युक्रेनमध्ये युद्ध झाले असते तर तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली असती. युक्रेनच्या बाजूने अमेरिकेसह युरोपीयन देशांनी मदत करण्याचे जाहीर केले होते. नाटो सदस्य देशांनी आपले सैन्यही सज्ज ठेवले होते. तर, रशियाने चीनसोबत चर्चा केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Russia Ukraine Tension : युक्रेन सीमेवरून सैन्य माघारीवर रशियाची चलाखी! अमेरिकेने केला मोठा दावा
- Ukraine-Russia : धोका टळला? युक्रेनजवळ तैनात असलेल्या रशियन सैन्याची पुन्हा घरवापसी
- Ukraine : युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेसह अनेक मित्र देश एकत्र, व्हाईट हाऊसचा दावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha