Crime News: आपल्या पोटच्या दोन्ही मुलांना विष पाजलं; पत्नीचा गळा दाबला, त्यानंतर पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत, नेमकं काय घडलं?
Crime News: उदयपूरमधील हिरन मगरी पोलीस स्टेशन परिसरातील प्रभात नगरमध्ये काल (शुक्रवारी) एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने प्रथम पत्नी आणि मुलांची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली.

राजस्थान: राजस्थानच्या उदयपूर इथं एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नी, आणि आपल्या दोन मुलांच्या हत्येनंतर पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पतीने आधी पत्नीचा गळा दाबला आणि 2 मुलांना विष देऊन मारलं. त्यानंतर स्वत: पंख्याला लटकून आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. ती वाचून पोलीस सुन्न झाले आहेत. शहरातील हिरण मागरी पोलीस स्टेशन परिसरातील प्रभात नगर भागात ही घटना घडली आहे.
एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि दोन निष्पाप मुलांची हत्या केली. त्यानंतर त्या व्यक्तीने स्वतः आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. शुक्रवारी सकाळी ही भयानक घटना उघडकीस आली, जेव्हा लोकांना या घरातून कोणतीही हालचाल दिसली नाही आणि दरवाजा उघडला गेला नाही. तेव्हा संशय आल्यामुळं पोलिसांना कळवण्यात आलं. वरिष्ठ पोलिस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील दृश्य अत्यंत हृदयद्रावक होतं
मुलांना विष देऊन मारलं नंतर...
दिलीप चितारा (40) यांचा मृतदेह खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर त्यांची पत्नी अलका (37) आणि मनवीर (10) आणि खुशबीर (3) ही दोन निष्पाप मुले बेडवर मृतावस्थेत पडली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की दिलीपने प्रथम पत्नी अलकाचा गळा दाबून खून केला, नंतर त्याच्या दोन्ही मुलांना विष दिले. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दिलीप बऱ्याच काळापासून आर्थिक संकटात होता असा पोलिसांना संशय आहे. सुमारे 5-6 महिन्यांपूर्वी, दिलीपने त्याचे काका मानक चितारा यांच्याशी कर्जाबद्दल बोलले होते. त्याच्या काकांनी त्याला घर विकून कर्ज फेडण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्यानंतर या विषयावर कोणतीही चर्चा झाली नाही.
दरम्यान, काल (शुक्रवारी) दिवसभर दिलीप यांच्या घरातून काही हालचाल झाली नाही. कुणीही बाहेर आले नाही त्यामुळे पहिल्या मजल्यावर राहणारे घरमालक रवी सचदेव यांना शंका आला. त्यांनी दरवाजा ठोठावला परंतु आतून काहीच उत्तर मिळाले नाही. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, पतीने प्रथम पत्नी आणि मुलांची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे.























