मोस्ट वॉन्टेड दहशतवादी झीनतसह दोघांचा खात्मा
लष्कराने ठार केलेला झीनत बुरहान वानीचा जवळचा मानला जात होता. 2017 मध्ये लष्कराने झीनतला मोस्ट वॉन्टेड घोषित केलं होतं. काही महिन्यापूर्वी झीनतचा बिर्याणी खातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला होता.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या हाती मोठं यश लागलं आहे. कुलगामच्या काटापोरा गावात शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत दोन कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी झीनत उल इस्लाम आणि त्याचा साथीदार शकील अहमद या चकमकीत ठार झाला.
लष्कराने ठार केलेला झीनत बुरहान वानीचा जवळचा मानला जात होता. 2017 मध्ये लष्कराने झीनतला मोस्ट वॉन्टेड घोषित केलं होतं. काही महिन्यापूर्वी झीनतचा बिर्याणी खातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला होता.
दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील काटपुरा परिसरात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलाने परिसरात शोधमोहीम सुरु केली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरु केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलानेही गोळीबार केला, ज्यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
लष्कराने 12 दहशतवाद्यांची हिट लिस्ट तयार केली होती. झीनतच्या खात्म्यानंतर आता या लिस्टमध्ये केवळ रियाज नायकू आणि जाकीर मुसा हे शिल्लक राहिले आहेत.
झीनत भूसुरुंग स्फोटकं बनवण्यात तरबेज
झीनत काश्मीरमध्ये सक्रीय असलेला सर्वात जुना दहशतवादी होता. भुसुरुंग तयार करण्यात तो एक्सपर्ट होता. 2015 मध्ये दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबामध्ये सामिल झाला होता. लश्करचा कमांडर बुरहान वानीचा तो खास मानला जात होता. भारतीय सेनाने झीनतवर 12 लाखांचं बक्षिस जाहीर केलं होतं.