एक्स्प्लोर
Advertisement
‘तिहेरी तलाक’ची प्रथा सर्वात वाईट, सुप्रीम कोर्टाचं परखड मत
नवी दिल्ली : इस्लाममध्ये विविध विचारधारेत तिहेरी तलाकला ‘वैध’ म्हटले असले तरी लग्न मोडण्यासाठी अवलंबलेली ही सर्वात वाईट पद्धत आहे. त्यामुळे ही प्रथा स्वीकारता येण्यासारखी नाही, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.
मुस्लिमांमधील तिहेरी तलाकच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील ऐतिहासिक सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि वरीष्ठ विधिज्ञ सलमान खुर्शीद यांनी या मुद्द्याची न्यायिक समीक्षा होण्याची गरज आहे, असे मत न्यायालयात मांडले. त्यावर न्यायालयानं ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. सलमान खुर्शीद हे या प्रकरणात न्यायालयासाठी न्यायमित्राची भूमिका निभावत आहेत.
दुसरीकडे ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनीही या प्रथेवर कठोर शब्दांत टीका केली. तिहेरी तलाक पद्धत ही सर्वात वाईट असून महिलांना समान अधिकार दिला जात नाही, असं मत मांडलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement