एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ट्रॅकवर उभं राहून सेल्फी, उडी न जमल्याने दोघांना रेल्वेने चिरडलं!
नवी दिल्ली: रेल्वे ट्रॅकवर सेल्फी घेणं दोन विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलं. धावत्या रेल्वेसमोर खतरनाक स्टंट करुन व्हिडीओ घेण्याच्या नादात, दोघांचा मृत्यू झाला.
या दोघांना खतरनाक स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करुन लाईक्स मिळवायचे होते. मात्र बिनडोकपणामुळे त्यांचा जीव गेला.
दोन्हीही विद्यार्थी दिल्लीतील मयूर विहार परिसरातील रहिवाशी होते. दोघेही एकाच वर्गात शिकत होते.
दोघेही शनिवारी संध्याकाळी स्टंटबाजीसाठी अक्षरधाम रेल्वे स्टेशनवर पोहोचले. दोघांनी चांगला प्रोफेशनल कॅमेराही भाड्याने घेतला होता. एकूण सात जण स्टंटबाजीसाठी रेल्वे स्टेशनवर आले होते.
सर्वात आधी शुभम आणि यश हे रेल्वेट्रॅकवर उभे राहिले. उर्वरीत मित्र व्हिडीओ बनवत होते. समोरुन ट्रेन आल्यानंतर दोघेही ट्रॅकबाहेर उडी मारणार होते.
मात्र ट्रेन वेगात आली आणि दोघांना उडी घेणं जमलंच नाही. त्यामुळे धावती ट्रेन दोघांना उडवून निघून गेली. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या मुलांनी यापूर्वीही अशी स्टंटबाजी केल्याचं सांगण्यात येत आहे.
VIDEO: व्हिडीओसाठी क्लिक करा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
क्राईम
Advertisement