एक्स्प्लोर

चेन्नईची तहान भागवण्यासाठी वेल्लोरहून रेल्वेने पाणी, 25 लाख लीटर पाण्याची वाहतूक

प्रत्येक वॅगनची 55 हजार लीटर पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. यासाठी 65 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीसामी यांनी दिली.

चेन्नई : पाणीटंचाईमुळे तहानलेल्या चेन्नईकरांसाठी चक्क रेल्वेनं पाणी आलं आहे. 217 किलोमीटर दूर असलेल्या वेल्लोर जिल्ह्यातून आलेलं पाणी स्वच्छ करुन नागरिकांना पुरवलं जाईल. 50 वॅगन असलेल्या ट्रेनमधून तब्बल 25 लाख लीटर पाणी चेन्नईत आणण्यात आलं. यापूर्वी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. ट्रेनमध्ये पाणी भरण्यास गुरुवारी रात्री एक वाजता सुरुवात झाली. सकाळी सात वाजून 10 मिनिटांनी जोलारपेटमधून निघालेली ट्रेन दुपारच्या सुमारास चेन्नईला पोहचली. प्रत्येक वॅगनची 55 हजार लीटर पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. यासाठी 65 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीसामी यांनी दिली. चेन्नई हे एक कोटी लोकसंख्येचं शहर आहे. आठ ते नऊ महिन्यांपासून लोक पाणीटंचाईचा सामना करत आहेत. सलग दोन वर्ष पावसाने हुलकावणी दिली. तलाव ओस पडले. जमिनीच्या पोटातलं पाणी इतकं उपसलं, की आता फक्त धूळ बाहेर पडते. चेन्नई आणि कांचीपुरम परिसरात तीन हजार छोटे-मोठे तलाव आहेत, पण ते गाळाने भरले होते. काहींवर अतिक्रमण केलं. खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे कष्ट सरकारने घेतले नाहीत. ईशान्य मान्सून चेन्नईत दाखल होईलपर्यंत म्हणजे अजून जवळपास तीन महिने वेल्लोरमधून रेल्वेनं पाणी आणण्यात येईल. गेले वर्षभर 9 हजार टँकर चेन्नईला पाणी पुरवतात. पण आता शहराच्या जवळपासचे स्त्रोतही आटले आहेत. त्यामुळे जगणं कठीण झालं आहे. सरकारने पाणी पुरवठ्यासाठी 250 कोटींची तरतूद केली आहे. शहराची रोजची पाण्याची गरज तब्बल 900 एमएलडी इतकी प्रचंड आहे. चेन्नईसारखीच वेळ 2020 च्या शेवटापर्यंत देशातल्या 21 शहरांवर येणार आहे. कारण अतिक्रमण, अमाप पाणी उपशामुळे जमिनीच्या पोटात पाणी राहणार नाही. 2030 पर्यंत 40 टक्के नागरिकांना पिण्याचं पाणी मिळणार नाही, असा अंदाज वर्तवला जात आहे. आजमितीला निम्मा देश दुष्काळाशी दोन हात करत आहे. पण पाण्याच्या प्रश्नावर ना सरकार गंभीर आहे ना लोकांना देणंघेणं. नुकतीच लैला नावाची एक वेब सिरीज नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झाली. आताच्या देशातल्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय स्थितीत फरक पडला नाही तर 2050 मध्ये भारत कसा असेल याचं काल्पनिक चित्र त्यात रंगवण्यात आलं आहे. त्यातला पहिलाच सीन पाणी चोरल्याच्या आरोपाचा आहे. पाणी ही त्या जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. चेन्नईकर 2050 ची स्थिती आजच अनुभवत आहेत. अख्ख्या देशाला सावध होण्यासाठी हे उदाहरण पुरेसं असावं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
मोठी बातमी: राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
Embed widget