एक्स्प्लोर

GST Collection : सप्टेंबर महिन्यात एकूण 1,17,010 कोटी रुपये जीएसटी कलेक्शन, महाराष्ट्रातील गेल्या वर्षीच्या तुलनेत 22 टक्क्यांची वाढ

गेल्या वर्षीच्या याच महिन्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलापेक्षा सप्टेंबर 2021 मध्ये 23 टक्के अधिक महसूल गोळा झाला आहे. या महिन्यात आयात केलेल्या वस्तूंवरील करापोटी 30 टक्के अधिक महसूल जमा झाला.

नवी दिल्ली : सप्टेंबर 2021 महिन्यात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करापोटी एकूण 1,17,010 कोटी रुपये महसूल संकलित करण्यात आला आहे. त्यापैकी सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 20,578 कोटी रुपये, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 26,767 कोटी रुपये, आयजीएसटी 60,911 कोटी रुपये (यामध्ये वस्तूंच्या आयातीवरील करापोटी जमा झालेले 29,555 कोटी रुपये) आणि अधिभार 8,754 कोटी रुपये ( यामध्ये वस्तूंच्या आयातीवरील करापोटी संकलित झालेले 623 कोटी रुपये) यांचा समावेश आहे.

सरकारने नियमित समझोता म्हणून आयजीएसटीमधून 28,812 कोटी रुपये सीजीएसटीला आणि 24,140 कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. सर्व देणी दिल्यानंतर, सप्टेंबर 2021 या महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारांना सीजीएसटीपोटी 49,390 कोटी रुपये आणि एसजीएसटीपोटी 50,907 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे.

सप्टेंबर 2020 महिन्यामध्ये महाराष्ट्रात 13,546 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलन झाले होते, तर सप्टेंबर 2021 मध्ये 16,584 कोटी रुपये जीएसटी महसुलाचे संकलन झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या जीएसटी महसूल संकलनात  22 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षीच्या याच महिन्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलापेक्षा सप्टेंबर 2021 मध्ये 23 टक्के अधिक महसूल गोळा झाला आहे. या महिन्यात आयात केलेल्या वस्तूंवरील करापोटी 30 टक्के अधिक महसूल जमा झाला असून देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल याच स्त्रोतांद्वारे गेल्या वर्षी याच महिन्यात संकलित महसुलापेक्षा 20 टक्के अधिक राहिला. सप्टेंबर 2019 मध्ये संकलित 91,916 कोटी रुपयांचा महसूल लक्षात घेतला तर यावर्षीचे महसूल संकलन गेल्या वर्षीपेक्षा 4 टक्क्यांनी जास्त आहे.

विद्यमान वर्षातील दुसऱ्या तिमाहीत एकूण मासिक सरासरी जीएसटी संकलन 1.15 लाख कोटी रुपये झाले आहे आणि हे या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत संकलित झालेल्या 1.10 लाख कोटी रुपयांच्या एकूण मासिक सरासरी संकलनाहून 5 टक्के अधिक आहे. अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याचे हे स्पष्ट निदर्शक आहे. आर्थिक विकासासोबतच, कर चुकवेगिरी करणाऱ्यांच्या विरोधातील कारवाई, विशेषतः बनावट बिले तयार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईने देखील जीएसटी महसूल संकलन वाढवण्यात योगदान दिले. आगामी महिन्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जीएसटी महसूल संकलन होण्याचा कल कायम राहील आणि या वर्षीच्या उर्वरित सहा महिन्यांमध्ये याहून अधिक जीएसटी महसूल संकलन होईल अशी अपेक्षा आहे. राज्यांच्या जीएसटी महसुल संकलनात येणारी तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांसाठी 22,000 कोटी रुपयांची जीएसटी भरपाई देखील दिली आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
AAP MLA Gurpreet Bassi : दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
Eknath Shinde : शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vaibhavi Deshmukh on Beed : तपासाबाबत पोलीस काहीच कळवत नाहीत, संतोष देशमुखांच्या लेकीचा आरोपNashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?Santosh Deshmukh Case Update : CID ने Vishnu Chate च्या कस्टडीसाठी केला कोर्टाकडे अर्जVasai Jewellery Shop Robbery : वसईच्या मयंक ज्वेलर्सवर दरोडा, चोरट्यांनी 50 तोळं सानं लुटलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
AAP MLA Gurpreet Bassi : दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
Eknath Shinde : शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Supreme Court on Reservation : '75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
'75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
Embed widget